Header Ads Widget

न्यायमूर्ती रमाई...

    दीन दुबळ्यांची माऊली-
    त्यागमूर्ती माता रमाई-
    अंध:कारात शोधी प्रकाश-
    दीपज्योती जणू अंगाई-
.
    फाटक्या संसाराला थिगळ-
    देण्या जीवन अर्पण केले-
    भिमरायांची बनून सावली-
    बहुजनांची ढाल समाजात झाले-
    अनेक संकटे येऊन ठाकली-
    धैर्याने केली त्यावर मात-
    भिजवली काया दलितांसाठी-
    गरिबांना दिला मदतीचा हात-
    माय बापाचे छत्र हरवले-
    दुःखाचे डोंगर सोबती होते-
    लाकुडफाटा,गोवऱ्या थापने-
    जगण्याचे कोडी सोडवत जाते-
    लहान मुलांचा होता लळा -
    अन्नधान्यासाठी बांगड्या दिल्या -
    कर्तुत्वाची खाण माऊली-
    गरीबी,दुःख,हालअपेष्ठात जगल्या -
    बाबासाहेबांना दुःखाची झळ-
    वाटून दिली ना कठीण प्रसंगात-
    आदर्श घ्यावा आज महिलांनी-
    अर्धांगिनी कशी रमते दुःख सागरात-
    सहनशिलतेचा एक पहाड-
    वेदना, त्यागात सामावलेला-
    भीमरावांना खंत वाटली-
    वेळ कधी ना दिला पत्नीला -
    -दिलशाद यासीन सय्यद, -
    अकोले अहमदनगर-
    9850923961-
    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

माता रमाई त्यागमुर्ती होती.

खूपच छान कविता.