Header Ads Widget

कौशल्य विकास विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच अमरावतीत - कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर

  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठाचे उपकेंद्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात लवकरच सुरू करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी आज सांगितले.

  उपकेंद्राच्या अनुषंगाने डॉ. पालकर यांनी परिसराची पाहणी केली, यावेळी त्यांनी स्थानिक उद्योजकांशीही चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, उद्योगांच्या मागणीनुसार रोजगारक्षम शिक्षण देऊन आवश्यक मनुष्यबळनिर्मितीसाठी कौशल्य विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग सायबर सिक्युरिटी, बिझनेस इंटेलिजन्स, इनोवेशन रोबोटिक्स अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. अभ्यासक्रमात 40 टक्के अभ्यासवर्ग आणि 60 टक्के ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ देण्यात येणार असल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर उत्तम प्रशिक्षित व अनुभवसिद्ध मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

  त्या पुढे म्हणाल्या की, केवळ यांत्रिकच नव्हे, तर संगणकीय व इतर कौशल्यांचे मिश्रण असलेल्या मेकॅट्रॉनिक्स शाखेतील कुशल मनुष्यबळाची गरज अमरावतीसारख्या शहरांतही आहे. कौशल्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांतून असे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. कौशल्य पुन:प्रशिक्षणाच्या संधी देणारे अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत. इनोवेशन हबद्वारे संशोधनाला चालना देण्यात येणार आहे.

  उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन नव्या कौशल्यांचा शोध घेणे, जागतिक पातळीवरील आधुनिक तंत्रज्ञानाचा वेध व त्यानुसार कौशल्य प्रशिक्षणाची व्यवस्था करणे हे आव्हान विद्यापीठापुढे आहे. त्यानुसार राज्यात सहा महसुली विभागात उपकेंद्रे सुरू करणे, उद्योगांशी चर्चा व त्यानुसार नव्या अभ्यासक्रमांची रचना, विद्यापीठासाठी आवश्यक मनुष्यबळाची भरती आदी प्रक्रिया वेगाने होत असल्याचे त्यांनी सांगितले.

  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या