Recent in Technology

Advertisement

Breaking News

बुद्ध धम्माचे विचार मनावर बिंबवण्यासाठी धम्म परिषद - सुरेश तायडे

    संघप्रिय वानखडे
    गौरव प्रकाशन वृत्त संकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : भौतिक सुखामागे धावण्याच्या तीव्र स्पर्धेतूनच मानसिक सुख हरवून बसवण्याची वेळ आली आहे. माणसाचा लोभ, क्रोध, अहंकार, व्यभीचार, मत्सर, मिथ्या दृष्टी, स्वार्थी वृत्ती, हव्यास वाढल्याने माणसाच्या या हव्यासापोटी हजारोंच्या गर्दीत धम्म संस्काराचा माणूस हरवला आहे. त्याने मानवसमाज हा अधोगतीकडे वळत आहे, आज तथागत बुद्धांच्या पावन भूमीत कोणी उपाशी तर कोणी तुपाशी अशी घृणास्पद परिस्थिती आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं मला शिकल्या सवरल्या लोकांनीच धोका दिला आणि आज ही वस्तुस्थिती आपण अनुभवत आहोत, त्यातच आजचे हजारो भिक्षु कौटुंबिक परिस्थितीने हताश होऊन धम्माचा अभ्यास न करता मार्गक्रम करतो मात्र अशा धम्म गुरूंवर अंकुश नाही, या सर्व कारणांमुळेच मानव समाज हा भयंकरच्या अंधारात उभा आहे. मानवाच्या आपलपोटेपणाचा पेटलेला हा वनवा कुठेतरी वीझवता आला पाहिजे, मानव हा समतापर्वा कडे वळला पाहिजे त्याने भुकेलेल्याची भूक तहानलेल्याची तहान जाणली पाहिजे, सम्यक वाणी सम्यक विचार सम्यक दृष्टी प्रियशांती धम्माच्या मार्गाकडे वळला पाहिजे,मुळात धम्म याचा अर्थ 'जगण्याचा मार्ग' आणि अर्थातच 'बुद्धाचा धम्म' म्हणजे वैश्विक करुणा, मंगल मैत्री, चारित्र्य संपन्नता, शांतता, विवेकाधिष्ठित जीवन आणि या नव्या पर्वाची लढाई अमरावती जिल्ह्यामध्ये रुग्णसेवक म्हणून परिचित असलेले सुरेश तायडे यांनी राज्यस्तरीय धम्मपरिषद आयोजित केली होती.

    यावेळी ते म्हणाले धम्मा विषयी आपले विचार ठाम असायला हवे, आपली निष्ठा ठाम असायला हवी, धम्मातून जिवनौध्दाराचा मार्ग मिळवता येतो, त्यासाठी आमचा विचार ठाम असायला हवा, कृती ठाम असायला हवी, निर्णय ठाम असायला हवा, व्यासंग ठामच असायला हवा, हा ठामपना कुठल्याही परिस्थितीत दगमळू देत नाही. आज आंबेडकरी समाज तरुणांकडे आशेने पाहत आहे, तुमच्या कर्तुत्वाकडे डोळे झाकून आहे, तुमच्याकडे महत्त्वकांशेने पाहत आहे. धम्माच्या अनुसरणाचा ठामपना तुमच्या विचारावर सम्यक दृष्टांत बिंबवतो, म्हणून तुम्हाला तुमच्यासाठी यश मिळवायचं नाही तुमच्या परिवारासाठी नाही तुम्हाला आपल्या मानव समाजासाठी धम्म त्यागी यश मिळवायच आहे. ही महत्त्वाची भूमिका आम्ही स्वीकारली पाहिजे. तेव्हाच बुद्धांचा समता बंधुता न्याय हा विचार गतिमान होईल.

    आजच्या मानवाची वैचारिक पातळी संकुचित विचाराने जीर्ण अंधश्रद्धेने अनिष्टतेने मलीन झाली आहे. धम्मज्ञान प्राशन न केल्याने वैचारिक प्रगती ढासळली म्हणून मानवाच्या डोळ्यावर मोहमायेची झापड आहे ती मानवाला भयंकराच्या दारात ठेवते, म्हणून बुद्धाचा प्रकाशमान धम्म येथे अमलात आणण्यासाठी आपल्या काळजातली तळमळ धम्मपरिषदच जागृत करू शकते.

    त्यासाठीच अमरावती येथे राज्यस्तरीय दोन दिवसीयधम्म परिषद पंचवीस व सव्वीस तारखेला सुरेश तायडे यांनी आयोजित केली होती. या धम्म परिषदेला अमरावती जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली व धम्मदेशना घेतली जेवणाची राहण्याची संपूर्ण व्यवस्था आयोजन समितीतर्फे करण्यात आली होती. धम्म परिषदेला उपस्थित भंते बुद्धिशजी महास्थवीर, भंते प्रज्ञाबोद्धीजी महास्थवीर, भंते आनंदजी महास्थवीर, भंते करुणाशील महास्थवीर, भिकुनी प्रजापती इत्यादी उपस्थित होते.

    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code