Header Ads Widget

हिवरखेड येथे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महावितरण अभियंत्याचा गौरव

    * सहाय्यक अभियंता रोहित म्हस्के यांचे कार्य कौतुकास्पद !
    गौरव प्रकाशन वृत्त संकलन

    मोर्शी (तालुका प्रतिनिधी) : मोर्शी तालुक्यामध्ये ‘गेल्या ६ वर्षांपासून हिवरखेड केंद्राचे सहायक अभियंता रोहित म्हस्के यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत राहावा यासाठी दिवस रात्र काशाचीही पर्वा न करता धडपड करणारा प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली असून हिवरखेड मंडळातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेणारे सहाय्यक अभियंता रोहित म्हस्के यांचा हिवरखेड येथील शेतकऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला.

    झोलंबा गावातील मौजे कसारी परीसरात असलेले कसारी रोहित्र क्रमांक १ हे मागील एक वर्षापासुन अतीभारीत होऊन वारंवार नादुरूस्त होत असल्यामुळे परीसरातील कृषिपंप धारक शेतकर्यांना संत्रा बागांना पाणी देण्यास मोठ्या प्रमानात अडचणी येत होत्या तसेच हिवरखेड दापोरी डोंगर यावली घोडदेव सालबार्डी परिसरातील रोहित्र अतीभारीत असल्यामुळे नविन विज जोडणी देखील प्रलंबीत होत्या. परिसरातील शेतकर्यांनी सदर रोहित्राची तक्रार मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे केली असता आमदार देवेंद्र भुयार यांनी महावितरण कंपनीचे हिवरखेड कार्यालयाचे सहायक अभियंता रोहित गणेशराव म्हस्के यांना तात्काळ सदर रोहित्राची पाहणी करून नविन रोहित्र उभारणीकरीता DPDC-NDSI योजनेएंतर्गत अंदाजपत्रक तयार करून ते वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याच्या सूचना करून सतत त्याचा पाठपुरावा केला व मा.आमदार श्री.देवेंद्र भुयार यांनी सदर कामाकरीता तात्काळ नीधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे सदर नविन रोहित्राचे काम पुर्णत्वास आले व प्रलंबीत कृषिपंपांना विज जोडण्या मिळाल्या व तसेच कृषिपंपांना अखंडीत विजपुरवठा मीळु लागल्यामुळे शेतकर्यांना समाधान व्यक्त केले. ज्या पद्धतीने शरिरात रक्त सगळीकडे वाहून नेण्याचे काम रक्तवाहिन्या करतात, त्याच पद्धतीने गावागावातून विद्युत प्रवाह सुरळीत ठेवण्याचे काम महावितरणचे कर्मचारी जीवाची बाजी लावून करतात. त्यांच्या या कामाची दखल घेऊन हिवरखेड येथील शेतकाऱ्यांतर्फे सहायक अभियंता रोहित म्हस्के, जीतेंद्र हरले, कमलेश धुर्वे, .प्रमोद घोरपडे यांना सन्मानित करून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

    कोरोनाचा काळ व चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना सहकार्य करून त्यांच्या समस्या सोडविणारे महावितरण कंपनीचे सहायक अभियंता रोहित म्हस्के व कर्मचारी हे सुरळीत वीजपुरवठा तसेच ग्राहकसेवेसाठी अत्यंत खडतर व आव्हानात्मक परिस्थितीत कर्तव्य बजावीत आहेत व त्यांचे कार्य अभिमानास्पद आहे’, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्यांना रुपेश वाळके यांनी उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान करतांना काढले.

    यावेळी सहायक अभियंता रोहित म्हस्के यांनी यावेळी ग्राहकांना आपल्या विजबीलाचा भरणा वेळेवर करण्याबाबत व तसेच कृषिपंपाला कॅपेसिटर बसवुन विज वापर करण्याबाबत विनंती केली. यावेळी परिसरातील शेतकरी पुरूषोत्तम जांभुलकर, बद्रे सर, राहुल तिडके, विजय भोजने, शेषराव नेहारे, अक्षय क्षीरभाते, अरून क्षीरभाते, गजानन हरले, प्रभाकर फुले, सुधीर नागले, दादाराव नेहारे, दादाराव गजभीये उपस्थीत होते

.
    --------------

    समाजामध्ये आपल्या जीवाची बाजी लावून अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य महावितरणच्या अभियंता, सहायक अभियंता, लाईनमनसह सर्व कर्मचारी करतात. कधी ही सेवा देणारा कर्मचारी लोकांच्या रोषाला बळी पडत असतो. मात्र, तरीही हे सर्व कर्मचारी मनापासून काम करतात. त्यामुळे दुर्लक्षित अशा महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेणे आणि सन्मान करणे हा आमचा उद्देश आहे.

-रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या