Header Ads Widget

फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षांचे ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे नियमित शुल्कासह ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in संकेतस्थळावर सादर करावयाची मुदत संपल्यामुळे त्यास 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डेटाबेसवरुन भरावयाची मुदत नियमित शुल्कासह 30 नोव्हेंबर तर विलंब शुल्कासह 2 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन काढून शुल्क बँकेत भरावयाची मुदत 5 डिसेंबर राहील. तसेच आरटीजीएस/एनईएफटीव्दारे शुल्क भरणा केल्यास विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलीस्ट 7 डिसेंबपर्यंत मंडळाकडे जमा करावी लागेल, असे अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सहसचिव तेजराव काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या