- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : धर्मादाय सहआयुक्त कार्यालय व सार्वजनिक न्यास वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा तालुक्यात गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी वस्त्रदान उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत राज्याचे धर्मादाय आयुक्त महेश केशव महाजन यांच्याहस्ते गरजू आदिवासी बांधवांना वस्त्रदान करण्यात आले.
आमदार राजकुमार पटेल, धर्मादाय सहआयुक्त संभाजी ठाकरे, उप धर्मदाय आयुक्त नवनाथ जगताप, सहाय्यक धर्मदाय आयुक्त रोहिणी पाठक, वकील संघाचे अध्यक्ष प्रमोद बोथरा, सार्वजनिक न्यास विभागाचे अधिक्षक पिंकी रॉय, निलेश करलुके, निरीक्षक संतोश राऊत, उमेश लुंगे, सचिन बाकल तसेच चिखलदरा नगर परिषदेचे नगरसेवक आदी यावेळी उपस्थित होते.
सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून गरजूंना वस्त्रदान हा उपक्रम निरंतर राबविण्यात येणार आहे. अनेकदा गरीब कुटुंबाकडे पैश्यांअभावी पुरेसे कपडे नसतात. तसेच थंडीच्या ऋुतूमध्ये आदिवासी बांधवांकडे गरम लोकरचे कपडे नसतात. अशा गरीब व गरजू कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक कपडे पुरविण्यात येणार आहेत. मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यांतील दुर्गम गावांमध्येही हा उपक्रम प्राधान्याने नियमितपणे राबविण्यात येणार आहे, असे धर्मादाय सहआयुक्त श्री. ठाकरे यांनी सांगितले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोरगरीब आदिवासी बांधवांना व महिलांना वस्त्रदान करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. आपल्याकडील वापरण्यायोग्य कपडे, नवीन कपडे, शाल, स्वेटर, ब्लँकेट, चप्पल जोडे आदी वस्तू कार्यालयात जमा कराव्यात. या कार्यात सहभागी होऊ इच्छिणा-यांनी धर्मादाय सहआयुक्त कार्यालय, दुसरा मजला, म्हाडाभवन, मालटेकडीजवळ, टोपेनगर, अमरावती अथवा निरीक्षक सं. र. राऊत यांच्याशी 8888212133 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन धर्मादाय सहआयुक्त श्री. ठाकरे यांनी केले.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–