• Wed. Jun 7th, 2023

शिक्षणाचे महत्त्व

  दलित समाजातील लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकारांना परमपूज्य मानतात. त्या समाजाला डॉ भिमराव यांनी वाचा दिली. स्वाभिमान दिला, देवाचे असे वर्णन करतात की परमेश्वर मुक्या माणसाला वाचा देतो बोलायला शिकवतो व पंगु माणसाला ओलांडण्याची शक्ति देतो. शतकानुशतके भारतीयांना क्षुद्र समाजाला वाचा नव्हती, अन्याय सहन करावे लागत, चीड़ व्यक्त करता येत नव्हती, लाखोच्या या मूक समाजाला बोलके केले ते मूकनायक ठरले. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मधे महू येथे झाला. त्यांना आधुनिक मनु म्हणून ओळखले जाते कनिष्ठ जातीचे प्रतिनिधी म्हणून त्यांची प्रभावी ओळख प्रख्यात कायदेपंडीत, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जातात. त्यानी विद्यापीठाची पदवी घेतल्यानंतर अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी आपल्या विचारप्रणालीत लोकशाही विचाराला स्थान दिले त्यांच्या कार्याचा गौरव आजही संपूर्ण जगाला एक प्रकारची चालना देत आहे त्यांच्या अनेक विचार प्रणाली असून शिक्षणाचा प्रसार त्यांनी कसा केला ते महत्वाचे ……..

  डॉ आंबेडकरांच्या मते प्राचीन काळापासून उच्चवर्णीय हा एकच वर्ग शिकत आला आहे व् इतर लोक शिक्षणापासून वंचित राहिलेले आहे म्हणून संपूर्ण शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. तरच मानसिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक परिवर्तन होईल व उच्चवर्गीय समाजाप्रमाणे आपल्य।मधेही बुद्धिमत्ता आहे. याची त्यांना जाणीव होईल न्युनगंड कमी होवून त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलेल.”आर्थिक परिवर्तन” समाजविकासाचा आधार हा आर्थिक परिवर्तन आहे कारण आर्थिक बाजु खंबीर असेल तर, शैक्षणिक क्रांती होण्यास असणारे अडथळे आपण समर्थपणे सोडवू शकतो…

  महामानवाचा एकच आदेश
  नाचुन मोठे होऊ नका तर, वाचून मोठे व्हा॥
  माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा
  माझे अपुर्ण राहीलेले काम प्राणपणाने पुर्ण करा॥

  जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर. एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या॥ भाकर तुम्हाला जगविल, तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल॥ असा महान संदेश त्यांनी जगास दिला आजही खुप मोलाचा आहे आपल्यासर्वांसाठी. आज ७ नोव्हेंबर २०१७ डॅा बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७ नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन राज्यातील शाळा व महाविद्यालयांत आज विद्यार्थी दिवस म्हणून साजरा होत आहे, ही एक ऐतिहासिक महत्वाची बाब म्हणावी लागेल.

  ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॅा बाबासाहेब आंबेडकर यांचा सातारा हायस्कूलमध्ये (राजवाडा चौकातील सध्याचे श्रीमंत छ. प्रतापसिंह राजे हायस्कूलमध्ये) प्रवेश झाला. डॅा बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत प्रवेश घेतला त्यावेळी त्यांचे नाव भिवा असे होते .या शाळेच्या रजिस्टरला १९१४ या क्रमांकावर बाल भिवाची स्वाक्षरी असून हा ऐतिहासिक दस्तावेज शाळा प्रशासनाने जपून ठेवला आहे. डॅा बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे. कारण बाबासाहेबांचे पाऊल शाळेत पडल्यामुळे ते स्वत: सुशिक्षित व प्रज्ञावंत तर झालेच, परंतु कोट्यवधी दलितांचे व वंचितांचे उद्धारकर्तेही झाले.

  शिक्षणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व बाबासाहेबांनी पुरेपूर जाणले होते. केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक आणि खर्या अर्थाने सर्वांगीण उन्नती होते याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच बाबासाहेबांनी शिका हा संदेश दिला.हा संदेश केवळ आपल्याच समाजाला दिला असे नव्हे तर जो जो समाज शिक्षणापासून, ज्ञानापासून वंचित आहे, त्या सर्वच समाजाने शिक्षणाचा ध्यास घेऊन ज्ञानी बनावे, प्रज्ञावंत बनावे हा मुख्य उद्देश होता. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे , जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय रहाणार नाही असे डॅा बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. बाबासाहेब आजन्म विद्यार्थी म्हणूनच जगले. विद्येचा वसा त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपला. त्यांच्या या विद्वत्तेमूळे जगातील सर्वात मोठे संविधान २ वर्षे ११ महिने १८ दिवस या अल्पकालावधीत पूर्ण करून देशाला बहाल केले व राज्यघटनेचे शिल्पकार ठरले. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये समाजात त्यांच्या मुळेच रुजू शकली. त्यांचा शाळा प्रवेश एक महत्वपूर्ण व ऐतिहासिक घटना ठरली. त्या प्रवेशाला आज ७नोव्हेंबरला ११७ वर्ष पूर्ण होत आहेत.

  आजच्या पिढीतील प्रत्येक विद्यार्थी हा देशाचे उज्वल आणि दैदीप्यमान भविष्य आहे. शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग आहे. बाबासाहेबांनी अठरा-अठरा तास अभ्यास केला. कठोर परिश्रम घेतले.त्यांच्या मेहनतीची जाण विद्यार्थ्यांना व्हावी व ते एक आदर्श विद्यार्थी बनावेत या हेतुने ७नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. महामानव म्हणून यांची जीवनयात्रा अत्यंत यशस्वी तेजस्वी दिग्विजयी अश्पृशोद्धारक देशोद्धारक धर्मोद्धारक अखिल मानव हितकारक प्रातः स्मरणीय आणि नित्य वंदनीय अशी आहे त्यांच्याबद्दल खुप काही लिहिण्यास आहे की लेखणी थांबणार नाही परंतु शेवटी शब्दांची मर्यादा असली की थांबावेच लागते.

  सौ.दिलशाद यासीन सय्यद
  ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळा,अकोले
  अकोले- ४२२६०१, अहमदनगर
  9850923961
  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *