रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न

    गौरव प्रकाशन वृत्त संकलन

    कल्याण (प्रतिनिधी) : तमाम संघटित असंघटित कामगार-कर्मचारी-अधिकारी यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिखर संघटना रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे राज्यस्तरीय अधिवेशन (केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार) ना. डॉ. रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेने आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, रंगमंदिर, कल्याण (प.) जिल्हा – ठाणे येथे मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात संपन्न झाले.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    यावेळी बोलताना ना. डॉ. रामदासजी आठवले म्हणाले, “एम्प्लॉईजचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याचे काम चालू आहे. कुणाची बदली होते, कोणाला सस्पेंड करतात, कोणाला प्रमोशन मिळत नाही. आशा पद्धतीचे प्रश्न असतात. अधिकाऱ्यांना पत्र देतो. अनेक अधिकाऱ्यांना फोन करतो. अनेकांना न्याय मिळतो अनेकांचे प्रश्न आपल्यामाध्यमातून सुटतात. रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने अनेक ठराव करण्यात आले आहेत. त्या ठरावाची अंमलबजावणी राज्यसरकार केंद्रासरकारने करावी आशा पद्धतीची मागणी त्यामध्ये करण्यात आली आहे. एम्प्लॉईजवर जे अन्याय होतात ते अन्याय होता काम नये. मागासवर्गीयांना पुढील प्रमोशन मिळावे. आशा प्रकारची मागणी ठरावात आहे. हा विषय मार्गी लावायचा आहे.”

    केंद्रीय सरचिटणीस रि. ए. फेडरेशनचे नेते आत्माराम पाखरे म्हणाले, “अधिवेशनात घेण्यात आलेल्या विविध मागण्या आणि ठराव यांचे करिता शासनाकडे पाठ पुरावा करण्यात येईल”.रि.ए. फेडरेशन ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख नेते संजय थोरात म्हणाले, “सेवाभर्तीचे प्रश्न व शिक्षण विभागातील प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्रभर संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न सहकाऱ्यांन सोबत करण्यात येईल. अधिकारी कर्मचारी यांच्यावर अन्याय झाल्यास त्यांनी संघटनेकडे संपर्क करावा. त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी संघटना वचनबद्ध आहे.”

    केंद्रीय सरचिटणीस रि. ए. फेडरेशनआत्माराम पाखरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रिपाई महाराष्ट्र प्रदेश सुरेश बारशिंगे, रिपाई जेष्ठ नेते अण्णा रोकडे, कल्याण-डोंबिवली जिल्हा अध्यक्ष रिपाई प्रल्हाद जाधव, उपाध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे, सुभाष पवार, एबीएम समाज प्रबोधन संस्थेचे संस्थापक,सीताराम गायकवाड आरपीआयचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादूरे, रि.ए. फेडरेशन कोषाध्यक्ष िद्धार्थ रणपिसे, महाराष्ट्र कार्यकारणी आणि ठाणे जिल्हा कार्यकारनिवरील आरपीआयचे पदाधिकारी इत्यादी सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जिल्हा, तालुका आणि विविध विभागातील कर्मचारी अधिकारी रिपब्लिकन एम्प्लॉईज ेडरेशनच्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन ाणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले होते. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी रि.ए. फेडरेशन ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख नेते संजय थोरात,रि.ए. फेडरेशन ठाणे जिल्हा नेते गवान पवार, रि.ए. फेडरेशन ठाणे जिल्हा अध्यक्ष ादासाहेब शिंदे, रि.ए. फेडरेशन ठाणे जिल्हा सरचिटणीस गौतम रातांबे, रि.ए. फेडरेशन ठाणे जिल्हा संघटक वनाथ रणखांबे, इत्यादी. यांनी मेहनत घेतली यावेळी ठाणे जिल्ह्यातील प्रभावी सामाजिक काम करणाऱ्या सीताराम गायकवाड, मेहबूब पैठणकर, ताराबाई घायवट, त्याच प्रमाणे महासचिव रि. ए. फेडरेशन आत्माराम पाखरे, एल आर गायकवाड इ. यांचा सत्कार ना. रामदासजी आठवले यांच्या हस्ते करण्यात आला.

    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–