- प्रशांत वाघ
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
वडाळा महादेव (प्रतिनिधी) : येथील दोस्ती फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक ४ डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह श्रीरामपूर या ठिकाणी सकाळी ९.३० ते ४.३० वा पर्यन्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी दीप प्रज्वलन प्रतिमापूजन स्वागतगीत लोक कलावंत पै मजनूभाई शेख स्मृतिगौरव पुरस्कार वितरण सोहळा तसेच काव्याजंली प्रमुख अतिथी सन्मान सोहळा या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र तसेच विविध जिल्ह्यातून नामवंत साहित्यिक लेखक कवी उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्ष दोस्ती फाउंडेशन रज्जाक शेख सर यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा डॉ एस एन पठाण कुलगुरू नागपूर विद्यापीठ उपशिक्षण संचालक मंडळ महाराष्ट्र राज्य उद्घाटक मा श्री बाबासाहेब सौदागर चित्रपट गीतकार सिने अभिनेते कवीसंमेलनाध्यक्ष मा वसुंधरा शर्मा सिने अभिनेत्री ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रमुख उपस्थिती मा श्री अनिल पवार साहेब प्रांतअधिकारी मा श्री प्रशांत पाटील साहेब तहसीलदार श्रीरामपूर मा श्री रमजानखान पठाण उपशिक्षण अधिकारी जि प अहमदनगर मा श्री संदीप मिटके साहेब पोलीस उपअधीक्षक मा डॉ वंदनाताई मुरकुटे मा सभापती पं समिती मा साईलता सामलेटी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मा डॉ गुंफा कोकाटे प्राचार्य कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापुर मा श्री सुभाष सोनवणे मा पोलीस अधिकारी मा श्री सुनील गोसावी संस्थापक अध्यक्ष शब्दगंध साहित्यीक परिषद मा श्री राकेश कुमार शिवदे आगारप्रमुख श्रीरामपूर मा श्री रामदास वाघमारे संस्थापक जीवनगौरव मासिक तसेच विशेष उपस्थिती माननीय श्री अंजुनभाई शेख मा श्री मुक्तार भाई शाह मा श्री राजेश अलघ मा श्री दीपक चव्हाण स्वागत अध्यक्ष श्री रज्जाक भाई शेख अध्यक्ष दोस्ती फाउंडेशन प्रसंगी कलारत्न शिक्षणरत्न समाजरत्न साहित्यरत्न आदर्श पत्रकार आदि पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहे तसेच निमंत्रित कवी यांचा कवी संमेलन व सन्मान सोहळा संपन्न होत आहे.
या कार्यक्रमासाठी साहित्यीक मिराबक्ष शेख कवी आनंदा साळवे श्री नितीन गायके श्री देविदास बुधवंत श्री शाहरूख शेख श्री बाबासाहेब पवार पत्रकार राजेंद्र देसाई श्री अमीनभाई शेख डॉ शैलेंद्र भनगे श्री सत्तारभाई शेख श्री नसिर शेख श्री अमोल शिन्दे श्री गुलाब फुलमाळी श्री सोमनाथ चौधरी तसेच सर्व पदाधिकारी यासाठी प्रयत्नशील आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा श्री चंद्रकांत वाकचौरे व सौ यशोदा पांढरे करणार आहेत.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–
धन्यवाद सर, प्रोत्साहन देवून आपण साहित्यिकांना बळ दिले आहे