- देश सारा विकत असताना
- आम्ही सारे
- निर्जीव पुतळ्यासारखे
- उभे राहून पाहत आहोत..
- हिंदू-मुस्लिम, जाती- धर्मात
- तल्लीन होऊन..
- लोकशाहीचा मुर्दा पडताना
- आपल्याच कोशात मशगुल आहोत..
- धार्मिक /सांस्कृतिक मनोरंजनाच्या विश्वात..
- सैनिकीव्यवस्था,
- न्यायव्यवस्था,
- प्रशासनव्यवस्था,
- शिक्षणव्यवस्था
- बटीक होत असताना
- आपण असे गप्पगार का..?
- आपल्यातला जोतीराव,बिरसा,बाबासाहेब, भगतसिंग, पेरियार हरवला का..?
- आमचा मेंदूच विचारशून्य
- झाला आहे का..?
- आमचे सारेच लोकशाही खांब
- जमीनदोस्त होत असताना
- भंकप,असत्य विचारांच्या
- मायाजालात हा देश
- गुरफटून गेलाय का ..?
- भांडवलदारी हुकूमशाहीच्या
- षडयंत्राने साऱ्या भारतीयांना
- गुलाम केले असताना
- कौर्यजीवी जंत
- फिदीफिदी हसत आहेत..
- गुलाम करणाऱ्या मजोरखोरांना
- जीवनद्रव्ये देत आहेत..
- अरे भारतीयांनो,
- गांधारी पट्टी उघडा रे..
- आपल्या शोषणाचे अड्डे
- उद्ध्वस्त करा रे..
- शोषण करणाऱ्या
- अलोकशाहीवृत्तीला
- मुळासकट उपटून फेका रे..
- भारत आपली वाट पाहत आहे…
- आपल्याला आवाज देत आहे..
- लोकशाहीला वाचवा रे..
- देशाला वाचवा रे..
- -संदीप गायकवाड
- नागपूर
- ९६३७३५७४००
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
Contents hide
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–