• Sun. May 28th, 2023

कवी संदीप राठोड यांच्या ‘भूक छळते तेव्हा’ या कविता संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी चंद्रकांत दादा वानखेडे यांच्या हस्ते

  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  निघोज (प्रतिनिधी) : कवी संदीप राठोड यांची पहिली कोयता ही कविता वृत्तपत्राने प्रसिद्ध करुण राठोड यांच्या कवितांचा प्रेरणामय प्रवास सुरू होउन आज त्यांचा भूक छळते तेव्हा हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध होणे ही बाब ग्रामिण भागांतील लोकांसाठी भुषनावह व अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी व पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे यांनी व्यक्त केले आहे.

  पारनेर तालुक्यातील निघोज येथील मुलिका देवी महाविद्यालयाच्या सभागृहात निघोज येथील प्रसिद्ध कवी संदीप राठोड यांच्या भूक छळते तेव्हा या कविता संग्रहाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध कवी संदीप राठोड यांच्या मातोश्री पारुबाई राठोड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सहदेव आहेर, प्राध्यापक विजय लोंढे, प्रसिद्ध कवी प्रशांत वाघ, प्रसिद्ध कवी रामदास पुजारी, संजय ओहोळ ( देवा ) महाराष्ट्र साहित्य दर्पणचे संपादक गुलाबराजा फुलमाळी, साहित्य साधना या संस्थेचे संचालक गणेश भोसले संजय पठाडे, कारभारी बाबर, चित्रकार शितलकुमार गोरे, स्वातीताई ठुबे, ओमप्रकाश देंडगे,समीर काळे, सतिष शेटे, अशोक गायकवाड, अशोक नाना आगळे, एकनाथ औटी, डॉ उमेश शेळके,उमेश गोरे, प्रा.प्रविण जाधव,विजय रोहकले, बाळासाहेब तरटे, रमेश रोहकले, सोमनाथ चौधरी,प्रा.तुषार ठुबे, संकेत ठाणगे, साहेबराव घुले, साहेबराव तांबे, स्वातीताई ठुबे,गितांजली वाबळे,योगिता भिटे,सुजाता रासकर, सुवर्णलता गायकवाड,सुप्रभा पुजारी, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, राठोड यांचे गुरुवर्य बाबासाहेब वराळ गुरुजी, कवी संदीप राठोड, जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील,सचिन वराळ पाटील,माजी विद्यार्थी व शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, माजी विद्यार्थीनी उज्वला काळे, रामचंद्र महाराज सुपेकर, निवृत्ती महाराज तनपुरे, विलासराव हारदे, पत्रकार आनंद भुकन, प्रसिद्ध फोटोग्राफर जयसिंग हरेल, अस्लमभाई इनामदार , ज्ञानांकुर शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, ग्रामस्थ आदी मान्यवर तसेच ज्यांच्या आर्थिक पाठबळाने हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला ते राठोड यांचे वर्गमित्र तसेच २००३ या दहावीच्या बॅचचे सर्व माजी विद्यार्थी तसेच ज्यांनी पुढाकार घेऊन खऱ्या अर्थानं हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यासाठी मोलाची मदत केली त्या पारनेर साहित्य साधना या संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसिद्ध कवी व पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक वानखेडे दादा यावेळी म्हणाले गेली सहा वर्षांपूर्वी कोयता ही पहिली कविता संदीप राठोड यांची अहमदनगर जिल्ह्यातील वृत्तपत्राने प्रसिद्ध करुण राज्याला ग्रामिण भागातील कष्टमय जिवणाचा सार मांडीत कवी मनाने ग्रामीण भागातील उस तोडणी मजूर असो की ईतर शेतकरी मजूर,महिला यांचे प्रश्न मांडीत समाजजिवणाचा कानोसा घेउन संदीप राठोड यांनी लक्ष वेधून घेतले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील उस तोडणी मजूर म्हणून काम करणाऱ्या आई वडिलांच्या कष्टप्रद जिवणात आलेल्या संदीप राठोड यांनी कविता आपल्या घरापासुन सुरू करीत उस तोडणी मजूराचे जिवण कसे असते हा जिवण प्रवास आपल्या कवितेतून वर्णन करीत आज त्यांचा कविता संग्रह प्रकाशित होत आहे. सर्वसामान्य व्यक्तीला हे कधीच शक्य होणार नाही ते राठोड यांनी शक्य दाखवले असून ही ग्रामिण भागातील नवकवींना प्रेरणादायी बाब असून यामध्ये वृत्तपत्रे, पत्रकार मित्र, पारनेर साहित्य साधना मंच , दहावीचे २००३ चे माजी विद्यार्थी,त्यांचा मित्र परिवार व निघोज ग्रामस्थ यांचे योगदान सर्वाधिक असून संदीप राठोड यांचा हा कवितांचा आनंदमय प्रवास सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणारा असून कवी संदीप राठोड यांचे भविष्य उज्वल व पारनेर तालुक्याचा नावलौकिक वाढविणारे असल्याचे गौरवोद्गार वानखेडे दादा यांनी व्यक्त केले आहे.

  मुलिका देवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सहदेव आहेर यावेळी म्हणाले प्रसिद्ध कवी संदीप राठोड हे जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे विद्यार्थी आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. निघोज येथील एक सर्व सामान्य उस तोडणी मजूराचा मुलगा आज कविता संग्रह प्रकाशित करीत राज्यात अद्वितीय बुद्धिमत्तेचा सन्मान मिळवीत आहे. मुलिका देवी महाविद्यालयाचा विद्यार्थी काय करु शकतो हे संदीप राठोड यांनी राज्याला दाखवून दिले आहे. आणी त्यांच्या भूक छळते तेव्हा या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्याचा सन्मान आज मुलिका देवी महाविद्यालयाच्या सभागृहात होत असून हा गौरव कार्यक्रम करण्याचा मान या महाविद्यालयाला मिळाला ही आनंदमय बाब आम्ही कधीच विसरू शकत नाही असे प्रतिपादन व्यक्त करीत डॉक्टर आहेर यांनी पारनेर साहित्य साधना मंच, पारनेर तालुका पत्रकार संघ व राठोड यांना धन्यवाद व्यक्त केले.

  कवी संदीप राठोड यांनी यावेळी सांगितले की माझी पहिली कविता वृत्तपत्राने प्रसिद्ध करुण मला व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे. कोयता या कवितेच्या माध्यमातून उस तोड मजूर व त्यांचे कुटुंबीय यांची हाल‌अपेष्टा व त्यांचे समाजजिवण मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी सुद्धा उस तोडणी मजूराचा मुलगा आहे. हे कष्ट मी लहाणपणी भोगले आहेत. मात्र ज्यावेळी आपण शाळा शिकलो तरच आपण समाज मनाचा आरसा समाजापुढे मांडू शकतो याची जाणीव मला प्रकर्षाने झाली व मी यावर कविता लिहीण्याचा प्रयत्न केला. वडील स्व.लहू तुकाराम राठोड आणी मातोश्री पारुबाई राठोड यांनी कष्ट करून मला प्रेरणामय जिवण जगण्याचा आनंद दिला. दहावीच्या २००३च्या माजी विद्यार्थ्यांनी मला आर्थिक पाठबळ दिले. पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक व प्रसिद्ध कवी चंद्रकांत दादा वानखेडे यांनी चार वर्षांपूर्वी निघोज येथील माझ्या झोपडीवजा निवासस्थानी असणाऱ्या शेतीत छोटेसे कवि संमेलन घेउन मला खऱ्या अर्थाने प्रेरणा दिली. माझी भुकन वस्ती, माझे निघोज ग्रामस्थ यांनी मला आपले मानून प्रेम दिले.जिव्हाळा निर्माण केला. बीड जिल्ह्यातील असूनही मी कधी निघोजकर झालो हे मला समजले नाही एवढे आपलेसे करुन पाठबळ दिल्याची भावना व्यक्त करीत राठोड हे भाउक झाले. वय वर्षे सहा ते वय वर्षे ३५ पर्यंतचा जिवणपट त्यांना आठवला ,डोळे भरुण आले. मात्र व्यासपीठावरील मान्यवरांनी आधार देत त्यांना पुन्हा बोलके केले. राठोड यावेळी म्हणाले पारनेर येथील साहित्य साधना मंचच्या पाठबळाने मन हेलावून गेले. सकाळ संध्याकाळाच्या भुकेची काळजी असणाऱ्या माझ्या सारख्या सर्व सामान्य व्यक्तीला आज सर्वांच्याच सहकार्याने भूक छळते तेव्हा या कविता संग्रह प्रकाशित करण्याचा सन्मान मिळत आहे.ही सन्मानित करणारी बाब मी आयुष्यभर विसरू शकत नाही असे प्रतिपादन व्यक्त करीत सर्वांना धन्यवाद व्यक्त करीत प्रसिद्ध कवी संदीप राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी वरील सर्वच मान्यवरांनी संदीप राठोड यांच्या कविता संग्रह प्रकाशित झाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत त्यांचे भरभरून कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच कवी संदीप राठोड यांचे वडील स्व.लहू राठोड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

  यावेळी मान्यवरांचा सत्कार संदीप राठोड मित्र परिवार व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आला. साहित्य साधना मंच, पारनेर तालुका पत्रकार संघ,मुलिका देवी महाविद्यालय, उपस्थीत सर्वच कविवर्य, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन, निघोज ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ,मुलिका देवी महाविद्यालय,दहावी २००३ माजी विद्यार्थी यांच्या वतीने प्रसिद्ध कवी संदीप राठोड यांचा सत्कार पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक व प्रसिद्ध कवी चंद्रकांत दादा वानखेडे व महाविद्यालये प्राचार्य डॉ सहदेव आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संजय ओहोळ ( देवा) गीतांजली वाबळे यांनी अतिशय सुंदर सुत्रसंचालन करीत पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक व प्रसिद्ध कवी चंद्रकांत वानखेडे यांच्या सहीत सर्वांचीच शाबासकी मिळवली. कार्यक्रमाचे निमंत्रक व साहित्य साधना मंचचे गणेश भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

0 thoughts on “कवी संदीप राठोड यांच्या ‘भूक छळते तेव्हा’ या कविता संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी चंद्रकांत दादा वानखेडे यांच्या हस्ते”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *