• Tue. Jun 6th, 2023

इंग्रजीच फॅड….

    नेहमी प्रमाणे मी आपला संध्याकाळी चालायला आमच्या इंथे असणाऱ्या राजीव गांधी क्रीडागणात गेलो. माझ्या अगोदर ही तिथे भलतेच नुमने रोज असतात. खर तर मी गेलो की पहिली नजर फिरवून घेतो. आहो तस काही नाही हो उगाच तुमच्या मनात काळ येत ,नजर ह्या साठी फिरवतो तिथे असणारी मंडळी आणि त्यांचा व्यायाम ,कधीच न पाहिलेला व्यायामाचा प्रकार रोज दिसतो म्हणजे दिसतो. कोण कसला व्यायाम करेल आणि कुठून आसन शोधून आणेल त्यांची त्यांना माहीत बिचाऱ्या रामदेव बाबांना ही माहीत नसतील अशी आसन इथं नजरेस पडतात.

    हा आता मी इतका ही नाकापुढे चालणारा नाही बर की जे आजूबाजूला सुंदर दिसत त्या कडे एक कटाक्ष ही टाकणार नाही.मी सुंदर दिसल की कटाक्ष टाकतो ,आणि मनात म्हणतो बर का व्हावं ” काय सुंदर आहे. कधी तरी मात्र मी मनात म्हणतो काय सुंदर आहे राव आणि अचानक ती सुंदरी माझ्या कडे पहाते त्या वेळी वाटत हिला मनात बोललेलं समजत तर नाही ना! असो विषयांतर होतंय मुद्द्यावर येतो….!

    एका चिमुरड्याला घेऊन त्याचे बाबा ही चालत होतो. अगदी ते बाप लेक काय बोलत आहेत ते स्पष्ट मला ऐकू ही येत होतं. मी काही अंतरावर असे पर्यत ते बाप लेक शुद्ध मराठीत बोलत होते, परंतु मी जसा त्यांच्या जवळ पोहचलो अचानक भाषा बदलली तो बाप मला पाहून त्याच्या मुलाशी इंग्रजीत बोलू लागला.मी म्हंटल सवय असेल. मी एक चक्कर मारली आणि पुन्हा त्याच्या जवळ जवळ आलो तो मुलगा मराठीत प्रश्न विचारत होता बाप मात्र इंग्रजीत बोलत होता. मला हसू आलं मी ते अजिबात दाबल नाही जोर जोरात हसलो.
    आणि निघून गेलो.

    तो मात्र माझ्या कडे एक टक पहात होता. हे मला मागे पाहिलं की जाणवत होतं.चालता चालता मात्र मनात अनेक प्रश्न उमटत होते. किती हा बेगडी इंग्रजी चा हट्टहास” इंग्रजी वाईट नाही परंतु उगाच आपण खूप मोठे अथवा हुशार आहोत हे दाखवण्यासाठी जर इंग्रजी बोलत असाल तर एक तर तुम्ही स्वतः ला वेड्यात काढून घेता. आणि दुसर म्हणजे मराठी बोलत असताना ही आपल्या मुलांच्या बरोबर जर इंग्रजी बोलत असाल तर मराठी टिकेल कशी ? आपली भाषा आपली संस्कृती, परंपरा, ह्या आपण जपायच्या असतात हे ही यांना कळू नये अस मी मनात म्हणत असताना समोर सुंदर चन्द्र दिसला….इथे ही गैरसमज आहो अंधार पडू लागला होता, आकाश्या कडे नजर गेल्यावर चंद्र दिसणारच की तो ही खरा खुरा.

    -अशोक पवार
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

0 thoughts on “इंग्रजीच फॅड….”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *