• Tue. Jun 6th, 2023

आधारकार्ड अद्ययावत करण्याबाबत सूचना

  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : दहा वर्ष पूर्ण झालेल्या आधारकार्डधारकांनी त्यांचे आधारकार्ड अद्ययावत केले नसल्यास आधारकार्ड बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी आपले आधारकार्ड दहा वर्षांपूर्वी काढले असतील व त्यानंतर त्यामध्ये कोणतेही बदल केले नसतील, अशा नागरिकांनी आपल्या ओळखपत्राचा पुरावा व पत्त्याचा पुराव्यासह संबंधित मुळ कागदपत्रे घेऊन आधार केंद्रावर जाऊन ही कागदपत्रे अपलोड करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

  ओळखपत्राचा नमुना व पत्त्याचा पुरावा संबंधित कागदपत्राची माहिती ही uidai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रत्येक आधार केंद्रावर कागदपत्रांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. नागरिकांनी आधार केंद्रावर जाऊन कागदपत्रे अपलोड करावी. वय वर्षे 18 असलेल्या नागरिकांचे नवीन आधारकार्ड काढावयाचे असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने नेमून दिलेल्या आधार केंद्रावर ही सुविधा उपलब्ध आहे. ज्या नागरिकांचे आधारकार्ड बनलेले आहेत ते आपला मोबाईल क्रमांक, पत्ता, ठसे व नाव पूर्वीप्रमाणे अद्ययावत करु शकतात. नवीन बालकांचे आधारकार्ड काढण्याचे काम सर्व आधार केंद्रावर पूर्वीप्रमाणे सुरु असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी दिली आहे.

  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

0 thoughts on “आधारकार्ड अद्ययावत करण्याबाबत सूचना”
 1. Very nice and Useful information For Adhar card update Best wishes to your YouTube channel & Abhinandan Regards Ravindra Ghugare Editor Srujan-Ekta Newspaper Amravati Director's Ravi-Raj Property Consultancy Amravati Cellphone No 7620388166

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *