अमरावती महानगरपालिका मालमत्‍ता करामध्‍ये भरघोस सुट

    गौरव प्रकाशन वृत्त संकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्‍ता धारकांना सुचित करण्‍यात येते की, विहित मुदतीत मालमत्‍ता कराचा भरणा करणा-या नागरीकांना मालमत्‍ता करात भरघोस सुट देण्‍यात आली आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरीता महानगरपालिका क्षेत्रातील संपुर्ण मालमत्‍तांचे अपेक्षीत मासीक भाडेदरामध्‍ये ४०% वाढ करुन कराची देयके निर्गमित करण्‍यात आली होती. सदरहू दरवाढीस तुर्तास स्‍थगीती देण्‍याचे अनुषंगाने कार्यपध्‍दती निश्चित करण्‍यात आली असून या कार्यपध्‍दतीनुसार मालमत्‍ता कराच्‍या पुनर्गणनेअंती चालु आर्थिक वर्षाची मागणी व थकबाकीच्‍या एकुण रक्‍कमेचा दि.३१ डिसेंबर,२०२२ पुर्वी एकमुस्‍त भरणा करणा-या मालमत्‍ता धारकांना शास्‍तीच्‍या रक्‍कमेवर १००% सुट प्रदान करण्‍यात आली आहे.

    पुनर्गणनेअंती चालु आर्थिक वर्षाची मागणी, थकबाकीची एकुण रक्‍कम व आकारण्‍यात आलेल्‍या दरमहा २% शास्‍तीपोटी देय असलेल्‍या एकुण शास्‍तीच्‍या रक्‍कमेपैकी २५% रक्‍कम महानगरपालिकेस दि.३१ जानेवारी,२०२३ पुर्वी एकमुस्‍त भरणा करणा-या मालमत्‍ता धारकांना शास्‍तीच्‍या रक्‍कमेवर ७५% सुट प्रदान करण्‍यात आली आहे.

    पुनर्गणनेअंती चालु आर्थिक वर्षाची मागणी, थकबाकीची एकुण रक्‍कम दरमहा २% शास्‍तीपोटी देय असलेल्‍या एकुण शास्‍तीच्‍या रक्‍कमेपैकी ५०% रक्‍कम महानगरपालिके दि.२८ फेब्रुवारी,२०२३ पुर्वी एकमुस्‍त भरणा करणा-या मालमत्‍ता धारकांना शास्‍तीच्‍या रक्‍कमेवर ५०% सुट प्रदान करण्‍यात आली आहे.

    पुनर्गणनेअंती चालु आर्थिक वर्षाची मागणी, थकबाकीची एकुण रक्‍कम व दरमहा २% शास्‍तीपोटी देय असलेल्‍या एकुण शास्‍तीच्‍या रक्‍कमेपैकी ७५% रक्‍कम महानगरपालिकेस दि.३१ मार्च,२०२३ पुर्वी एकमुस्‍त भरणा करणा-या मालमत्‍ता धारकांना शास्‍तीच्‍या रक्‍कमेवर २५% सुट प्रदान करण्‍यात आली आहे.

    चालु आर्थिक वर्ष सन २०२२-२०२३ करीताचा मालमत्‍ता कराचा भरणा दि.३१ डिसेंबर,२०२२ पर्यंत केल्‍यास मालमत्‍ता करातील सामान्‍य कराच्‍या २% सवलत देण्‍यात येणार आहे. तसेच ऑनलाईन पध्‍दतीने कर भरणा करण्‍याकरीता नागरीकांचा सकारात्‍मक प्रतिसाद प्राप्‍त व्‍हावा यास्‍तव सन २०२२-२०२३ करीता उपरोक्‍त नमुद कालावधी तसेच त्‍यानंतरच्‍या कालावधीकरीता देवू केलेल्‍या सवलती शिवाय अतिरिक्‍त १% सवलत देय असणार आहे.

    या सुवर्णसंधीचा लाभ घेण्‍याकरीता नागरीकांनी महानगरपालिकेचे झोन कार्यालयास भेट द्यावी, तसेच ऑनलाईन कराचा भरणा करण्‍याकरीता महानगरपालिकेचे संकेतस्‍थळ www.amravaticorporation.in यास भेट द्यावी. आपल्‍या मोबाईलवरुन कर भरण्‍याकरीता My Amravati app गुगल प्‍लेस्‍टोअर वरुन डाऊनलोड करुन त्‍वरीत कराचा भरणा करावा असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्‍यात आले आहे.

    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–