- * जाहीर लिलाव 6 जानेवारीला
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती, : जप्त रेती साठ्याच्या लिलावासाठी इच्छुकांकडून उपविभागीय अधिकारी, अचलपूर यांच्या कार्यालयामार्फत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. जप्त करण्यात आलेल्या साठ्याची किंमत अपसेट प्राईज प्रति ब्रास 600 रुपये असून एकूण अपसेट रक्कम 9 लक्ष 78 हजार घोषित करण्यात आली आहे. जप्त रेतीसाठ्याच्या घोषित हातच्या किमतीनुसार जाहीर लिलाव उपविभागीय अधिकारी अचलपूर यांच्या दालनात शुक्रवार, दि. 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.
मौजा भुगांव ता. अचलपूर जि. अमरावती येथील गट नं 334 येथील वासणी मध्यम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रातील पिली नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणातून अंदाजे 1 हजार 630 ब्रास रेतीसाठा आढळून आल्यावरुन उपविभागीयस्तरीय व तालुकास्तरीय विशेष पथकामार्फत कार्यवाही करण्यात येवून या कार्यवाही दरम्यान सदरचा साठा जप्त करण्यात आला आहे.
जाहीर लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्ती, संस्था व शासकीय विभाग यांना लिलावात सहभागी होण्यासाठी अर्जासोबत ई-मेल आयडी, पॅनकार्ड, जीएसटी नंबर, करारपत्रक, रहिवासाचा पुरावा व आयकर भरणा करत असल्याचा पुरावा इत्यादी दस्ताऐवज सादर करावे लागतील. तसेच लिलावासाठी भरावयाची इसारा रक्कम व इतर सर्व रकमा धनादेशाव्दारे भराव्या लागतील. इसारा रक्कम वगळून अपसेट प्राईजच्या 25 टक्के रक्कम भरावी लागेल. लिलावात सर्वोच्च बोली ज्यांच्या नावे मंजूर होईल, त्यांना मंजूर रकमेवर शासन निर्णयानुसार आयकर 2 टक्के जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी (लिलाव रकमेच्या 10 टक्के) विहित मुद्रांक शुल्क भुपृष्ठ भाडे भरावे लागेल.
जाहिरनामा प्रसिध्द झाल्यानंतर दि. 6 जानेवारी रोजी प्रस्तावित लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यक्ती, संस्था व शासकीय विभाग यांनी दि. 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेपूर्वी शासकीय कार्यालयीन वेळेत उपविभागीय अधिकारी कार्यालय, अचलपूर येथे नाव नोंदविणे, धनादेश सादर करणे बंधनकारक राहील, असे अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी कळविले आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–
- (छाया : संग्रहित)