- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाकडून अमरावती जिल्ह्यातील एकूण 14 तालुक्यातील 257 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी मतदान रविवार, दि. 18 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी मतदारांना भरपगारी सुटीची विशेष सवलत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.
या ग्रामपंचायतींपैकी चांदूर रेल्वे तालुक्यातील ग्रामपंचायत सावंगी संगम, नांदगाव खेडेश्वर तालुक्यामधील ग्रामपंचायत चिखली वैद्य, वरुड तालुक्यातील ग्रामपंचायत डवरगाव, मोर्शी तालुक्यामधील ग्रामपंचायत बेलोणा तसेच दर्यापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सांगवा बु. या पाच तालुक्यातील पाच ग्रामपंचायती अविरोध झाल्याने त्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित 252 ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे.
मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, व्यापार, औद्यागिक उपक्रम तसेच इतर आस्थापना किंवा निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीत तसेच महानगरपालिकेसारख्या मोठ्या नागरी वसाहतीच्या ठिकाणी नोकरीनिमित्त कामास येणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतीमध्ये कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी मतदारांना भरपगारी सुटीची विशेष सवलत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यासाठी शहरी भागात किंवा निवडणूक नसलेल्या भागातील दुकाने, कंपन्या, वाणिज्यिक आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–