Header Ads Widget

Sunil Shende : प्रतिभावंत अभिनेता हरपला - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, : मराठीसह हिंदी मालिका, सिनेमांमध्ये सहज अभिनय, शब्दांवरील पकड आणि स्पष्ट शब्दोच्चार यामुळे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे प्रतिभावंत अभिनेता हरपला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

    मंत्री श्री. मुनगंटीवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, मालिका आणि सिनेमांबरोबर अनेक नाटकांत काम केलेल्या श्री. शेंडे यांनी दोन दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत राहून पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले. श्री. शेंडे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद असून, आपण त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या