अमरावती (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) ‘सामाजिक न्याय पर्व’ सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा जात पडताळणी समितीच्या माध्यमातून प्रक्रियेविषयी ऑनलाईन प्रशिक्षण सत्र सुरू करण्यात आले आहे.
समान संधी केंद्रात काम करणारे कर्मचारी, विद्यार्थी व महाविद्यालयीन अनु. जाती, विजाभज., इ.माव. व वि.मा.प्र. प्रवर्गातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आहे. प्रशिक्षणामध्ये जात पडताळणी अर्ज ऑनलाईन कसे भरावा, कोणते दस्तऐवज जोडावे या संबंधी माहिती देण्यात येत आहे.
त्यात प्रथम टप्प्यात ऑनलाईन मार्गदर्शन शिबीर झाले. समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपायुक्त तथा सदस्य जया राऊत, संशोधन अधिकारी दिपा हेरोळे आदी उपस्थित होते. श्रीमती राऊत यांनी ऑनलाईन अर्ज स्विकारण्याच्या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. विधी अधिकारी रितू तराळ यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया व न्याय निवाड्याबाबत मार्गदर्शन केले. प्रकल्प सहायक अमन नाचोणे, उच्चश्रेणी लघुलेखक शालिनी गायगोले, व्यवस्थापक सुमती सोनटक्के यांनी वेबीनारचे कामकाज सांभाळले.
उद्या, बुधवार दि. 23 नोव्हेंबर रोजी चांदुर बाजार येथील जी.एस. टोम्पे ज्युनिअर कॉलेज, धामणगाव रेल्वे येथील आदर्श सायन्स जे.बी. आर्ट्स ॲण्ड बिरला कॉमर्स महाविद्यालय येथे जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अंजनगाव सुर्जी येथील श्रीमती राधाबाई सारडा आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज तर दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालय येथे 24 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अमरावती येथील ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय येथे 25 नोव्हेंबर रोजी तर हरिकिशन मालू इंटरनॅशनल स्कूल येथे 26 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. परतवाडा येथे सिध्दार्थ विद्यालय, कॅम्प आणि अचलपूर येथील सुबोध हायस्कूल येथे 29 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. चांदुर बाजार येथील जी.एस. टोम्पे ज्युनिअर कॉलेज येथे 30 नोव्हेंबर रोजी अर्ज स्वीकारण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अंजनगाव सुर्जी येथील श्रीमती राधाबाई सारडा आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज आणि दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालय येथे 1 डिसेंबर रोजी अर्ज स्वीकारण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मोर्शी येथील भारतीय महाविद्यालय येथे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचे शिबिर 2 डिसेंबरला आयोजित करण्यात आले आहे. धामणगाव रेल्वे येथील आदर्श सायन्स जे.बी. आर्ट्स ॲण्ड बिरला कॉमर्स विद्यालय येथे 5 डिसेंबरला तर अमरावती येथील ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात 6 डिसेंबर रोजी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शिबिरात सहभागी करुन घ्यावे. याबाबतचे नियोजन वरील महाविद्यालयांनी आपल्या स्तरावरुन करावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य तथा उपायुक्त जया राऊत यांनी केले आहे.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या