अमरावतीतील उद्योग,व्यापार,,वैद्यकीय,अभियांत्रिकी इत्यादीं क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा लौकिक सादर करणाऱ्या 'नामवंत' ह्या अलौकिक ग्रंथाचे प्रकाशन काल दि.२७-११-२०२२ रोजी स्व..सोमेश्वर पुसदकर सभागृह हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ परिसर अमरावती येथे नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात दिमाखाने पार पडले.अमरावती शहरातील ३२ नामवंताचे कार्यकर्तृत्व, कौशल्य व महत्ती ह्यांची विस्तृत माहिती देणारा हा ऐतिहासिक ग्रंथ आहे.ह्या नामवंतामध्ये प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ.प्रफुल्ल बाबाराव कडू,तोमई शैक्षणिक संस्थेच्या सौ.जयमाला व श्री जयवंत जाधव ,बोके प्रिंटर्स आणि सरस्वती बुक्सचे श्री नानासाहेब बोके,'रघुवीर' चे संचालक श्री दिलीप पोपट,जाधव इंडस्ट्रीजचे श्री संजय जाधव,'घरकुल' उद्योग समूहाचे श्री अरुण वरणगांवकर, प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ श्री श्रीकांत देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव अभियंता श्री धनंजय धवड इत्यादिंचा समावेश आहे.
विदर्भातील प्रसिद्ध पत्रकार व लेखक श्री शशीकांतजी ओहळे लिखित हा ग्रंथ अमरावतीकरच नव्हे तर भारतातील भावी पीढीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणारा संदर्भग्रंथ ठरणार आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिका ,राष्ट्रीय कवयत्री व ह्या ग्रंथाच्या भाष्यकार डॉ.शोभाताई रोकडे ह्यांनी प्रतिपादित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावतीचे प्रसिद्ध उद्योजक श्री संजय जाधव तर प्रमुख अतिथीत महाराष्ट्राचे माजी जलसंपदा व अर्थ राज्यमंत्री श्री सुनिलभाऊ देशमुख, आमदार श्रीमती यशोमतीताई ठाकूर,'अमरावतीचे छप्पन स्वभाव' पुस्तकाचे लेखक श्री.जी.बी.देशमुख,प्रस्तुत ग्रंथाचे लेखक श्री शशिकांतजी ओहळे तसेच अमरावतीतील अनेक क्षेत्रातील मान्यवर प्रकाशन सोहळ्यास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'मराठी कट्टा' चे युवा कवी श्री संदीप देशमुख,मानपत्र वाचन 'मराठी कट्टा'चे युवा साहित्यिक श्री विशाल मोहोड व अप्रतिम सोहळ्याचे अप्रतिम सूत्रसंचालन 'मराठी कट्टा'च्या सौ.प्राजक्ता राऊत ह्यांनी केले.ह्या ग्रंथाचे सुंदर मुखपृष्ठ अमरावतीचेच श्री सुनिल जयवंत देशमुख ह्यांनी साकरलेले आहे असून अद्वेत प्रकाशनने हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. परिवर्तन प्रबोधिनी,बिलीव्ह फाऊंडेशन व मराठी कट्टा ह्यांनी ह्या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन केले होते.
- 'मराठी कट्टा' अमरावती
- --------------
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- --------------------
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- --------------------
0 टिप्पण्या