Header Ads Widget

आनंदाच्या भूमीतील स्वप्ने

  गोवा/मुंबई, : कोस्टारिका हा देश जगातल्या सर्वाधिक आनंदी देशांपैकी एक मानला जातो. साध्या-सोप्या गोष्टींमध्ये आनंद मानणारा हा देश प्रत्येक क्षण भरभरुन जगण्यावर विश्वास ठेवतो. आणि म्हणूनच, अशा आनंदी, उत्साही देशाला मनोरंजनाचं केंद्र असलेल्या चित्रपटांचं आकर्षण असणं स्वाभाविकच आहे. कोस्टा रिकाचे चित्रपटविश्व म्हणजे रंगीबेरंगी चित्रपटांचा सुंदर कॅनव्हास असतो आणि दरवर्षी हा कॅनव्हास अधिकाधिक सुंदर होत जातो.

  ह्यावर्षी 53 व्या इफ्फी मध्ये कोस्टारिकाचे दोन चित्रपट दाखवले जाणार आहे. त्यातला एक गोल्डन पिकॉक स्पर्धेत असलेला व्हेलेन्टीना मौरेल दिग्दर्शित 'आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स( 2022)' हा चित्रपट आहे. हा चित्रपट इव्हा या आपल्या आईसोबत राहणाऱ्या सोळा वर्षांच्या मुलीच्या आयुष्याभोवती फिरतो. पौंगडावस्थेत असलेल्या इव्हाची कोवळी स्वप्ने आणि बाहेरचं निष्ठुर जग यांच्यातला संघर्ष या चित्रपटात प्रभावीपणे मांडला आहे. इव्हा आणि तिच्या वडलांमधले प्रेम- राग अशा परस्परविरोधी भावनांची गुंतागुंत असलेले नातेसंबंध या चित्रपटात ज्या प्रभावीपणे दाखवण्यात आले आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना अक्षरशः रोलर कोस्टरमध्ये बसल्यासारखा अनुभव मिळतो.हेच या चित्रपटाचे बलस्थान आहे.

  त्याशिवाय, या महोत्सवात डोमिंगो अँड द मिस्ट( 2022) या चित्रपटही दाखवला जाणार आहे. यातला नायक डोमिंगो त्याच्या घरावर आलेल्या जप्तीविरोधात लढा देतो. डोमिंगोच्या मालमत्तेत एक रहस्य दडलेले आहे. त्याच्या आधीच्या पत्नीचे भूत त्याला भेटते. आपला प्रदेश न सोडण्याचा डोमिंगोचा निश्चय या सिनेमातून व्यक्त होतो.

  गोव्यात 20 ते 28 पर्यंत सुरु असलेल्या या चित्रपट महोत्सवातल्या कोस्टारिकाच्या चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी आपण सज्ज आहात ना ?

  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या