Header Ads Widget

भारतीय महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले याचा पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न

  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ सलग्नित भारतीय विद्या मंदिर द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय, अमरावती येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला.

  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आराधना वैद्य प्रमुख वक्ते डॉ.नीता कांबळे, मराठी विभाग प्रमुख उपस्थिती डॉ.प्रशांत विघे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, डॉ. सुमेध वरघट, सह-राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी,डॉ. स्नेहा जोशी, महीला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी,डॉ.पल्लवी सिंग, सह-राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होत्या. सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला हारर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचा प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रशांत विघे यांनी केले.

  भारतीय महाविद्यालय अमरावती येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी बोलताना डॉक्टर मीता कांबळे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा व कार्याचा आढावा घेतला एखाद्या व्यक्तीचे पुण्यस्मरण म्हणजे त्याच्या विचारांना नीट समजून घेणे व विचारांचे व कार्याचे अनुसरण करणे होय असे त्या म्हणाल्या महात्मा फुलेंच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या विचारांना कृतीत उतरवण्यासाठी ते सतत कटीबद्ध राहिले कोणत्याही कृतीशिवाय नुसता विचार निष्फळ ठरतो यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करत राहणे व कृतिशील असणे हा महात्मा फुलेंनी दिलेला मूलमंत्र होय आजच्या आधुनिक युगातही सर्वत्र अंधकार दिसत असेल तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या देदीप्यमान विचारांचा दीप हाती घेऊन आपण जीवनात मार्गक्रमण केले पाहिजे तोच खरा मानवी यशाचा व कल्याणाचा मार्ग होय असे मार्गदर्शन त्यांनी केले.

  याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या