Featured Post

काय घिऊन जासीन ?

Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

सिनेमॅटिक साहसी प्रवास करण्यास तयार आहात का ?

    अरुणा जयवर्धन दिग्दर्शित श्रीलंकन चित्रपट "मारिया: द ओशन एंजल" इफ्फी 53 मध्ये गोल्डन पीकॉक पुरस्काराच्या स्पर्धेत

    गोवा/मुंबई,: 1901 मध्ये श्रीलंकेचा (त्यावेळी सिलोन म्हटल्या जाणार्‍या) सिनेमाशी पहिल्यांदा परिचय झाला. ब्रिटीश गव्हर्नर वेस्ट रिजवे आणि दुसऱ्या बोअर युद्धातील कैद्यांसाठी एका खाजगी स्क्रीनिंगद्वारे देशात प्रथमच चित्रपट दाखवला गेला. बोअर युद्धातील ब्रिटीश विजय, राणी व्हिक्टोरियाचे दफन आणि एडवर्ड सातवा याचा राज्याभिषेक या घटनांची माहिती देणारा हा एक लघुपट होता. वसाहतवादाच्या छायेतून बाहेर येत सुमारे 2 कोटी 20 लाख लोकसंख्या असलेल्या या छोट्या बेटावरील देशातील करमणूक उद्योगाने आता खूप मोठा पल्ला गाठला आहे. श्रीलंकेतील सिनेमा आता सार्वजनिक बाब आणि संस्कृतीचा उत्सव बनला आहे.

    53 व्या इफ्फी महोत्सवात मारिया: द ओशन एंजल (2022) हा अरुणा जयवर्धन दिग्दर्शित श्रीलंकन चित्रपट आंतरराष्ट्रीय स्पर्धा श्रेणी अंतर्गत प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पुरस्कारासाठी स्पर्धा करत आहे. हा चित्रपट समुद्राच्या मध्यावर गेलेल्या मच्छिमारांच्या समूहाभोवती आणि त्यांना अपघाताने लागलेल्या शोधाभोवती फिरतो. हा दैवी हस्तक्षेप आहे का? की ते फक्त त्यांना स्वतःला आणि एकमेकांना वेगवेगळ्या प्रकाशात पाहू लागले आहेत? मारिया: द ओशन एंजल तरुण मुलांसह समुद्रात प्रवास करतो तेव्हा गतिशीलता आणि आणखी बरेच काही शोधून काढतो. श्रीलंकन चित्रपटसृष्टीचे जनक मानल्या जाणार्‍या लेस्टर जेम्स पेरीस यांच्या ‘गंपेरलिया’ (1963) या चित्रपटाला इफ्फीत फिचर फिल्मसाठी पहिला गोल्डन पीकॉक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आता ५३ व्या इफ्फीत इतिहासाची पुनरावृत्ती होईल का? हे लवकरच समजेल पण तोपर्यंत सिनेमॅटिक साहसी प्रवासासाठी सज्ज व्हा आणि मारिया: द ओशन एंजेलचे स्क्रीनिंग चुकवू नका.

    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code