Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

आरसा...!

  प्रत्येक आरस्यात प्रतिकाची
  दिसणारी प्रतिमा
  ही खरीच असते असं नाही
  तर आरस्यागणिक प्रतिमा
  बदलत जात असते
  प्रतिकाची वास्तव प्रतिमा बघायची झाल्यास
  आरसाही तेवढाच पारदर्शक असावा लागतो
  अन्यथा काच बाजारात
  अनेक प्रकारचे मिळतात
  तेव्हा काय बदलायचे ?
  ते तुम्ही ठरवा
  मी प्रतिकं बदलणार नाही.
  -अरुण विघ्ने

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code