- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये सौविधानिक मुल्ये रुजवण्यासाठी तसेच संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी अमरावती स्पंदन परिवार बहुऊद्देशीय संस्था संचालित बीइंग आर्टिस्ट अकॅडेमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्टस्, अमरावती येथे संविधान दिनानिमित्त "वर्तमान सामाजिक परिस्थिती मधील संविधानाचे महत्व" या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
घटनेच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या भारतीय संविधानाचे जनक तसेच घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाची सुरवात प्रास्ताविक - उद्देशिका व राष्ट्रगीताने करण्यात आली त्यानंतर संविधान दिनाचे महत्व पटवून देतांना संस्थेच्या संचालीका स्नेहा वासनिक म्हणाल्या कि, आजच्या माँडर्न कल्चर मध्ये राहणारया पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करणाऱ्या आपल्या देशाच्या तरूण पिढीमध्ये सौविधानिक मुल्ये रूजवण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकत्र मिळुन हा दिवस साजरा करणे व समजून घेणे महत्वाचे आहे, त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष पंकज धंदर आणि कोषाध्यक्ष प्रविणसिंग तोवर यांनी संविधान दिनाचा इतिहास व महत्व सांगत उपस्तिथ विद्यार्थ्यांमध्ये तत्कालीन सामाजिक परिस्तिथी मधील संविधानाचे महत्व या विषयावर चर्चा घडवून आणली.
देशाचा राज्यकारभार कसा चालावा त्याचे नीतिनियम , एक आदर्श राष्ट्र म्हणून ओळखले जाण्यासाठी देशाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सांस्क्रुतिक जडण घडण योग्य रित्या होण्यासाठी देशातील प्रत्येक घटकाचा विचार करून तयार करण्यात आलेला नीतिनियम व कायद्याँचा आराखडा तसेच नागरिकांचे अधिकार कर्तव्ये सांगणारी चौकट म्हणजे संविधान होय, हे समजावून सांगतांना बीइंग आर्टिस्ट अकॅडमीचे विद्यार्थी संदेश बायस्कर आणि अक्षय बकसरे यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. महिलांच्या मूलभूत अधिकारांची माहिती जनसंपर्क वर्षा इंगोले यांनी दिली तर सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, दर्जाची व संधीची समानता, मतदानाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार याबाबतची माहिती यश कावरे, जीवन माहुरे रामभाऊ कोठार, उत्कर्ष बागडे, चैतन्य सराफ, रुपेश सराटकर, विवेक वाकोडे, यांनी दिली.
शेवटी माध्यमांचे विद्यार्थी म्हणून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी स्वीकारत शेगाव चौक येथे स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून संविधानाचा त्रिवार जयघोष करण्यात आला.
- --------------
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- --------------------
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- --------------------
0 टिप्पण्या