अमरावती (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील *दोस्ती फाउंडेशनच्या वतीने* लोक कलावंत पैगंबरवाशी मजनू भाई शेख यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्तने राज्यस्तरीय उत्कृष्ट सन्मानाचा "जीवन गौरव पुरस्कार" जेष्ठ मातोश्री लक्ष्मीबाई काशिनाथ सोनवणे गणेशनगर ता. राहाता जि. अहमदनगर यांना जाहीर झाला आहे.
४ डिसेंबर २०२२ रविवार रोजी श्रीरामपूर येथे मान्यवरांच्या हस्ते मातोश्री लक्ष्मीबाई सोनवणे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. मातोश्री लक्ष्मीबाई सोनवणे ह्या साहित्यिक सुभाष सोनवणे यांच्या मातोश्री असुन त्यांनी खुप संघर्षमय जीवन प्रवास करुन प्रसंगी गोधड्या शिवून आपल्या फाटक्या संसाराला टाके घातले आहे. स्वतःहा अशिक्षित असतांना निसर्ग व समाजाच्या शाळेत अनुभवाचे शिक्षण घेतले.व मुलांना शिकवून मोठे केले. व्यसनमुक्ती वाचनसंस्कृती तंटामुक्ती मानवता व निसर्ग संवर्धनाचे शिष्टाचाराचे सुयोग्य धडे दिले आहे.त्यांचे दोन मुले सेवानिवृत्त पोलिस अधिकारी असून एक मुलगा उद्योजक आहे. या पुर्वी त्यांना "समाजभूषण" व "आदर्श माता" अशा पुरस्काराने समाजाने सन्मानीत केले आहे.
वयाची ८८ वर्ष पार करीत असतांना त्यांना हा सन्माननाचा राज्यस्तरीय पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येत आहे.नुकतेच दोस्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ कवी रज्जाकभाई शेख यांनी या आशयाचे निवडपत्र देवून कळविले आहे.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या