Header Ads Widget

हरभऱ्याची राखण करण्यासाठी रात्री गेलेला मुलगा परतलाच नाही.!

    अमरावती : दर्यापूर तालुक्यातील धामोडी येथील एका युवा शेतकऱ्याने शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. गौतम सुभाष डोंगरे ( वय २४, रा. धामोडी) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. गौतमकडे एक एकर शेती आहे. मात्र, कुटुंबाला आर्थिक साहाय्य व्हावे म्हणून त्याने लागवडीने शेत केले होते. त्या शेतात हरभरा पिकाची लागवड केली.

    शेतात रात्रीच्या वेळी रानडुकरे पीक फस्त करत असल्यामुळे गौतम शेतावर लक्ष ठेवण्यासाठी सोमवारी रात्रीच्या वेळी गेला होता. सकाळी तो घरी लवकर परतला नसल्याने त्याच्या वडिलांनी शेतात जाऊन पाहिले असता गौतमने झाडाला गळफास लावल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. गौतमच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या