अमरावती (प्रतिनिधी) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत अल्पसंख्यांक समाजातील युवक-युवतींसाठी अल्पमुदतीचे रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अमरावती विभागातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची सुरुवात येत्या 15 नोव्हेंबरपासून करण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा लाभ मुस्लिम, ख्रिचन, शिख, जैन, पारशी, बुध्दिष्ट व इतर अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक कार्यालयाचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक प्रदिप घुले यांनी केले आहे.
त्यानुसार विभागातील अमरावती, अमरावती (मुलींची), रहाटगांव, अचलपूर, अकोला, अकोला (मुलींची), बाळापूर, अकोट, वाशिम, कारंजा लाड, मानोरा, यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, पांढरकवडा, वणी, घाटंजी, बुलडाणा, खामगांव, मलकापूर, मोताळा, शेगांव, लोणार, मेहकर या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पमुदतीचे कौशल्य प्रशिक्षण सुरु होत आहे.
प्रत्येक व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी 30 जागा असून तीन महिन्यांचा अभ्यासक्रम कालावधी आहे. प्रवेश घेण्यासाठी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.), आधारकार्डची छायांकित प्रत, अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा तसेच दोन पासपोर्ट आदी कागदपत्रेक आवश्यक आहे.
याबाबतची अधिक माहितीसाठी उपरोक्त नमूद औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये इच्छुक उमेदवारांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. या सुवर्ण संधीचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील युवक व युवतींनी घ्यावा, असे आवाहन व्यवसाय व प्रशिक्षण सहायक संचालक आर. एम. लोखंडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या