Featured Post

काय घिऊन जासीन ?

Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

संविधानदिनी कार्यालये व शाळांमध्ये उद्देशिकेचे सामूहिक वाचन

    * अधिकाधिक सहभागाबाबत जिल्हाधिका-यांचे आवाहन
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाबाबत जनजागृतीसाठी संविधान दिनानिमित्त शनिवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सर्व कार्यालये व शाळा-महाविद्यालयांत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. या उपक्रमात अधिकाधिक संस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

    संविधानदिनानिमित्त समाजकल्याण आयुक्तालय व जिल्हा प्रशासनातर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे.

    संविधानबाबत जनजागृती व्हावी यासाठी शाळा व संस्थांनी संविधान यात्रा काढावी. संविधानाची उद्देशिका, मूलभूत हक्क, कर्तव्ये, जबाबदा-या आदी महत्वाची कलमे ठळकरित्या फलकांद्वारे प्रदर्शित करावेत. निबंध, भित्तीपत्रके, मूलभूत तत्वांवर चर्चा, वेबिनार, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले.

    संविधानातील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे व त्यांना जागरूक नागरिक बनवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे, असे समाजकल्याण उपायुक्त माया केदार यांनी सांगितले.

    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code