Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

गांधी ,नेहरू, आंबेडकरांनी केली आजच्या भारताची पायाभरणी -संजय आवटे

  सोमेश्वर पुसतकर स्मृती व्याख्यानमाला
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत हा देश म्हणून कधीही उभा शकणार नाही, असे विन्स्टन चर्चिलसह अनेक ब्रिटीश नेते सांगत होते मात्र आज भारत जगात अतिशय शक्तिशाली आणि महत्त्वपूर्ण देश म्हणून अभिमानाने उभा आहे.आजचा भारत हा गांधी, नेहरू आणि आंबडकरांनी उभारलेला भारत आहे. त्यांनी ज्या मूल्यांची पाठराखण करून हा विविधांगी संस्कृती -परंपरांचा देश उभा केला, ती मुलतत्वे समजून घेऊन त्यांची पाठराखण केली पाहिजे. विविधतेतील एकता जपली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठय पत्रकार व नामवंत वक्ते संजय आवटे यांनी येथे केले.

  स्वर्गीय दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालय नांदगाव पेठ च्या वतीने आयोजित सोमेश्वर पुसतकर स्मृती व्याख्यानमालेत 'आम्ही भारताचे लोक' या विषयावर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या परिसरातील सोमेश्वर पुसतकर सभागृहात आयोजित जाहीर व्याख्यानात ते बोलत होते . नामवंत सामाजिक कार्यकर्ते वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मीडिया वॉच चे संपादक अविनाश दुधे, दत्तात्रय पुसतकर शिक्षण संस्थेचे सचिव श्रीकृष्ण बाळापूरे व कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दरणे हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

● हे वाचा – हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप ; अमरावतीच्या युवकाचे संशोधन

  कोणी एक व्यक्ती या देशाचा तारणहार होऊ शकत नाही आणि भविष्यातही होणारही नाही. स्वतंत्र भारताचे संविधान देशातील कुठलाही व्यक्ती, धर्म, विचारधारा वा संस्था -संघटनेला ते समर्पित करण्यात आले नसून भारताचा सर्वसामान्य माणूस, त्याचे हित, त्याचे हक्क , मूलभूत अधिकार याला संविधानात महत्व देण्यात आले आहे. त्यामुळेच संविधानाच्या केंद्रस्थानी 'आम्ही भारताचे लोक' आहे. भारताचे उज्वल भवितव्य हे या देशातील नागरिकांवरच अवलंबून आहे, असे ते म्हणाले.

  स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, त्याग हे विसरून या देशाचा इतिहास केवळ ८ वर्षाचा आहे आणि देशाची जी काही प्रगती झाली आहे ती गेल्या आठ वर्षात झाली, हे ठसविण्याचा प्रयत्न सातत्याने होतो आहे. अशा परिस्थितीत गांधी, नेहरू, आंबडेकरांनी कुठल्या प्रतिकूल परिस्थितीत या देशाची उभारणी केली हे नवीन पिढीला सांगितले पाहिजे .गांधींनी या देशातील सामान्य, निरक्षर माणसांचे सामूहिक शहाणपण ओळखून सर्व समाजाला सोबत घेऊन स्वातंत्र्य लढा उभारला.पंडित नेहरूंनी ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वाटेवर या देशाला नेले. आज जो देश दिसतो आहे , त्याची पायाभरणी नेहरूंनी केली. देशातील सामाजिक विषमता निपटून काढून शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम डॉ. आबेडकरांनी केले. ही त्रयीच खऱ्या अर्थाने भारताचे भाग्यविधाते आहेत, असे आवटे म्हणाले.

  आज सत्तेत असणाऱ्यांनाजवळ स्वतःचे आदर्श नसल्यामुळे गांधी, आंबेडकर, नेताजी बोस हे जणू आमचे स्वयंसेवक होते, ते चित्र ते निर्माण करत आहे. महापुरुषांचे अपहरण करणारे स्वातंत्र्याच्या, समाजसुधारणेच्या लढ्यात होते कुठे, असा सवाल त्यांना करायला हवा, असे आवटे म्हणाले.

● हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

  प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य विजय दरणे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अविनाश दुधे यांनी दिला.संचालन प्रा पंकज मोरे यांनी केले.आभार विकास अडलोक यांनी मानले कार्यक्रमाला माजी मंत्री डॉ सुनील देशमुख, कमलताई गवई,पुष्पाताई बोडे,दिनेश बुब,प्रा .दिनेश सूर्यवंशी, डॉ .अविनाश चौधरी, हरिभाऊ मोहोड,राजाभाऊ देशमुख, किशोर देशपांडे, जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे, सुनील यावलीकर, प्रा. हेमंत खडके, प्रा. प्रसेनजीत तेलंग, अविनाश भडांगे,वृषाली पुसतकर सारिका उबाळे, वैभव दलाल, सुनील जयवंत देशमुख, श्रीकांत खोरगडे, नीलेश लाठिया, महेश गट्टाणी, भूषण पुसतकर, हर्षल रेवणे, प्रा. गोविंद तिरमनवार, विकास अडलोक, हरीश नाशिरकर, वैभव कोनलाडे, आदी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

  ------
  75,000 चा धनादेश प्रदान

  सदर कार्यक्रमांमध्ये कोंडेश्वर रोडवरील कृष्णमूर्ती बालकाश्रमातील मोनाली खंडारे या भगिनींला सोमेश्वर पुसतकर आणि दिनेश बुब यांच्या जाणता राजा वेल्फेअर सोसायटीच्या वतीने 75 हजार रुपयांचा धनादेश याप्रसंगी प्रदान करण्यात आला.

  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code