Recent in Technology

Advertisement

Breaking News

लोकशाही...

  अज सकायी सकायीसच राज्या
  लोकशाही बुढी माया घरी आली
  काय सांगू मने अरुणबाबू तुले
  माली लयच बेक्कार गत झाली ?
  माया घरी हायेत मने चार तरनेबांड
  पन येकई लेकाचं त्यातलं सुदं नाई
  चारचे चारई हून रायले मले बेईमान
  त्यातला येकई रखवाली करत नाई !
  चोर, उचक्क्यापासून मायवाल्या
  रखवालीचं यायले देल्लं होतं काम
  पन हे मलेच दोरखंडानं बांधतेत
  मायापासून घेते बिनकामाचे दाम !
  ह्या चौघाईच्या नावानं घटनाकारानं
  लिहून ठिवला हाये येक सातबारा पोरा
  त्यापरमानं कामाची हिस्सेवाटनी केली
  पन हे माया जनतेवरच दाखोतेत तोरा !
  आपलं काम कोनीच धळ करत नाई
  नियमाचा अर्थ बराबर लावत नाईत
  वान्नेरासारखे चौघं गुप बसतेत पन
  कोनाचंच पितय उघळं पाळत नाईत !
  नेमून देल्ल्याली आपली जिम्मेदारी
  प्रत्येकानं नित्यनेमानं पार पाळाव
  कोनाच्या कामात नाक खुपसू नोय
  लोकायच्या खाल्ल्या मिठाले जागावं
  पन यायनं लेकराचे वाखे करनं लावले
  खा ले दाना आन् लेवाले कपळा नाई
  हे मातर मस्त भोपयावानी पोकलेत
  कोनाचीच बोलाची हिंम्मत होत नाई !
  चोरायचे झाले शाव,शावाचे झाले चोर
  जिकळे तिकळे पयवापयवी सुरू हाये
  योजनायचे यायनं सारे कपळे फाळले
  रखवालदार डोये झाकून बसले हाये !
  बुढी हमसून हमसून लळत होती
  लळता लळता तीचा तरास सांगत होती
  म्या हूं म्हणून गुपचाप आयकत होतो
  थे मातर मायाकळं आशेनं पाहात होती !
  आता आमालेच काईतरी करा लागीन
  जुने राखनदार आता बदलवा लागीन
  वावराचा कुपच वावर खावून रायला
  आमालेच वावराचा जागल्या व्हा लागीन !
-अरूण विघ्ने (जागल काव्यसंग्रहातून)
  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code