अमरावती (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या दि. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याच्या कार्यक्रमांतर्गत दि. 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत दावे स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.
तथापि, याच कार्यक्रमांतर्गत दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी झाल्यानंतर दि. 23 नोव्हेंबर 2022 ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत पुन्हा दावे व हरकती स्विकारण्यात येणार असून या काळामध्ये सुध्दा पदवीधर मतदार संघाची मतदार नोंदणी करता येणार आहे.
दि. 30 डिसेंबर 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतरही, निरंतर मतदार नोंदणी ( Continuous Updation) निवडणूकीसाठी उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नोंदणी करता येईल. त्यानुसार सर्व पात्र पदवीधर मतदारांनी उक्त कालावधीमध्ये मतदार नोंदणी करावी, असे विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी कळविले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या