Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

म्हसनखाई

  रस्ता म्हसनखाईचा
  वाटे बेजाच भेवाचा,
  असो गरीब अमीर
  न्याय सारखा देवाचा-!
  मेला मानुस जवा बी
  जाते म्हसनखाईत,
  तथी मुरदा बजार
  जीत्ते कोनीबी नाईत-!
  चार खांद्यावर जवा
  मडं थाटातच जाते,
  पेटवून मुरद्याले
  मांगं फिरतात नाते-!
  भळभळ जयेलोक
  थांबतात तथी सारे,
  जथी तथी वाह्यतात
  निरा मतलबाचे वारे-!
  राख घंट्यातच व्हते
  हाळं शांबूत राह्यते,
  कोन काय घेते देते
  आत्मा सारच पाह्यते-!
  गावाभाईरच राह्ये
  वटा म्हसनखाईचा,
  भग पाह्यजेच त्याले
  असो मानूस,बाईचा-!
  जीवनाले मरनाची
  सदा असतेच जोळ,
  म्हून मानूनच घ्या रे
  जगन्याले तुमी गोळ-!
  -दिनेश मोहरील,
  अकोला
  8888045196
  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code