- घाल घाल पिंगा वा-या
- माझ्या अंगणात
- माहेरी जा सुखासाठी
- कर बरसात !!
- सासरी गेल्यावर सुध्दा मुलीला माहेरची काळजी असते. ती अंगणातील वा-याला आपला दुत बनवून
- माहेरी जाऊन आईकडे फेरफटका मारून ये. आणि
- माझी खुशाली तीच्या कानात सांगून ये. खरंच
- माहेर हे कसही असो गरिब/श्रीमंत पण प्रत्येक मुलीला प्रिय असतं. सासरी गेल्यावर माहेरच्या
- आठवणी जास्तच येतात. अस्स माहेर सुरेख बाई
- जात ते दळाव, सपीट काढावे, आईच्या हातच्या
- सुंदर स्वादिष्ट करंज्या खाव्यात. किती गंमत असते
- ना, लहानपणापासून आईच्या हाताची चव जिभेवर
- रूळत असते. सासरी गेल्यावर सुध्दा तिथल्या चवीची सवय व्हायला देखील किती वेळ लागतो.
- प्रत्येक सणाला देखील आईच्या हातची पुरण पोळी,
- बासुंदी,अहो ऐवढेच नाही तर साधा कणीकेच्या
- शि-याची कित्ती आठवण येते म्हणून सांगू?
- राखी, भाऊबीज, पाडवा, माहेरी जायची लगबग
- सुरू असते. घाईघाईत बरेच काही विसरलाय होतोय. माहेरी आली की काय करू नी काय नाही.
- आई अग माझे ते कुठे ठेवले,हे कुठेच सामान दिसत
- नाही. आई आज हे कर रोजची नवीन फर्माईश.
- माहेर म्हणजेच आराम
- अल्लड वागणे माहेरीच
- हट्ट धरून बसण्यास माहेर
- बिनधास्त माहेरी राहायंच !!
- शाळेतील मित्र मैत्रिणी शेजारच्या मैत्रिणी फेरफटका
- मारणे, सिनेमा, नाटक, हाॅटेलींग, जुने खेळ, लगोरी
- काच लपवणे, बाहुला बाहुली चे लग्न, पत्ते लपंडाव
- वा काय मज्जा असते माहेरी.
- काय लिहू किती लिहू
- माहेरासाठी नाही सापडत शब्द
- अस्स माहेर सुरेख बाई
- माहेरच्या ओढीने होते मी नि:शब्द !!
- सासरी कितीही सुख असेल पण माहेरची आठवण
- सतावतेच. माहेरची आठवण काढली की चेहरा सुध्दा प्रफुल्लित होतो. म्हणूनच म्हणतात ना?
- "स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी "
- आईचा मायेन फिरवलेला डोक्यावरून हात,आईचा
- पदर, आईचे हलकेच रागावणे, आईवडीलां जवळ
- हट्ट, लाडावणे, भावांडात मस्ती, भांडण, खरंच खूप
- आठवणी असतात माहेरच्या. म्हणूनच भुलाबाईच्या
- गाण्यातसुध्दा म्हटले आहे"अस्सं माहेर सुरेख बाई "
- खेळायला मिळते. पण एकदा सासरी गेलेली मुलीला
- माहेरपण कधी कधीच मिळतं. म्हणतात ना ?"तीन
- दिवसांचे माहेरपण साडी चोळी करा तीला ओटी भरुन पोरीची पाठवण करा पोरीला "!!
- -हर्षा वाघमारे
- नागपूर
- 9923819752
- --------------
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- --------------------
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- --------------------
- (छाया : Sakal)
0 टिप्पण्या