- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : बौद्ध उपासक संघ भिमटेकडी परिसर अमरावती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, उत्तम नगर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, उत्तम नगर अमरावती येथे नुकतीच घेण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान बुद्ध व स्मृतीशेष दादासाहेब गवई यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पन करण्यात आले. प्रारंभी बौद्ध उपासक संघाच्या उपासक व उपासिका यांनी सामूहिक त्रिशरण पंचशील घेवून अभिवादन केले. प्रसंगी सदर स्पर्धा परिक्षेचे आंबेडकरी विचारवंत व बौद्ध उपासक संघाचे अध्यक्ष मा. शिवा प्रधान यांनी फीत कापून उद्घाटन केले. सदर उद्घाटकीय भाषणात बोलतांना आंबेडकरी विचारवंत व बौद्ध उपासक संघाचे अध्यक्ष मा. शिवा प्रधान यांनी असे प्रतिपादन केले की, बुद्ध धम्म हा जगाला तारणारा एकमेव धम्म आहे. आणि हा धम्म वैज्ञानिकतेवर, सत्यशिलतेवर चालणारा धम्म आहे. म्हणून प्रत्येकाने या बुद्ध तत्त्वज्ञानाची कास धरून त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे प्रबोधनकारी कर्तव्य, कुशल कर्म केले पाहिजे येणार्या काळात बुद्ध हाच जगातील एकमेव सत्यधम्म म्हणून उरणार आहे. या बौद्धमय जगामध्ये आपलाही प्रचार प्रसार कार्याचा वाटा असावा असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन बौद्ध उपासक संघाचे सचिव आयु. उमेश शहारे यांनी तर आभार प्रदर्शन आयु बौद्ध उपासक संघाचे कोषाध्यक्ष आयु. जी. एस. इंगळे यांनी केले. सदर परीक्षेकरिता एकूण 344 विद्यार्थ्यांनी नामाकंन केले आणि परीक्षेला 280 विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग नोंदविला. सदर स्पर्धा परीक्षा पर्यवेक्षनाकरिता आयु. उमेश शहारे, आयु. भाऊराव डहाट, आयु. अवधूत गजभिये, आयु. राहूल हिरकने प्रा. वासुदेव मनवर, आयु. चरणदास काळे, आयु. आनंद इंगळे, आयु. आयु.अनिल वानखडे, आयु.भीमराव गजभिये, व्यंकटराव खोब्रागडे, आयु. डी. के. बागडे, आयु. प्रतिभा प्रधान, आयु. नलिनी नागदिवे, आयु. पुष्पा दंदे, आयु. नंदिनी वरघट, आयु. वर्षा गाडगे, आयु. नामदेवराव वाघमारे इत्यादींनी स्पर्धा परीक्षेचे पर्यवेक्षण केले व परीक्षा नियंत्रक म्हणून आयु. जी. एस. इंगळे यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा परीक्षा समन्वयक म्हणून प्रा. डॉ. रजनी गेडाम व आयु. उमेश शहारे यांनी काम पाहिले.
स्पर्धा परीक्षेचे कुशल कामकाज आंबेडकरी विचारवंत व बौद्ध उपासक संघाचे अध्यक्ष मा. शिवा प्रधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मल्लू पडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व उपासक संघाच्या कार्यकारीणी पाहिले. सदर परीक्षा यशस्वी करण्याकरिता उपासक संघाचे आयु. नामदेवराव वाघमारे, व सदस्य तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद यांनी अथक परीश्रम घेतले.
- --------------
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- --------------
0 टिप्पण्या