अमरावती (प्रतिनिधी) : समता सैनिक दल, शाखा हिंगणघाट यांच्या वतीने नुकतीच 'राष्ट्रगौरव परीक्षा (जिल्हा स्तरीय) डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा या केन्द्रावर पार पडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान समितीमध्ये दिलेल्या तीन ऐतिहासिक भाषणाचे संकलन असणारे 'भारत राष्ट्र आणि भारतीय राष्ट्रवाद' या पुस्तकावर आधारित राष्ट्रगौरव परीक्षा (जिल्हा स्तरीय ) घेण्यात आली. या परीक्षेमध्ये परीक्षार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.अ व ब अश्या दोन गटा मध्ये ही परीक्षा आयोजित केली होती. परीक्षेच्या आधी सर्व परीक्षार्थानी परीक्षा केन्द्रावर राष्ट्रगीत म्हणून व नंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचुन करुन परीक्षेला सुरुवात केली.
ही परीक्षा मुख्य परीक्षा नियंत्रक मार्शल सुधीर रिंगणे आणि समता सैनिक दल जिल्हा वर्धाचे अध्यक्ष मार्शल मयूर धाबर्डे यांच्या मार्गदर्शनात केंद्राध्यक्ष म्हणून डॉ. अरविंद पाटील, सह केंद्राधिकारी प्रकाश जिंदे, आयुष्यमती उषाताई मात्रे यांनी कर्तव्य पार पाडले. यावेळी मार्शल आदित्य दुर्गे परीक्षा बोर्ई अधिकारी केंद्रावर उपस्थित होते.
ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी समता सैनिक दलाचे केंद्रीय अध्यक्ष मा .अशोक खन्नाडे सर, मार्शल उमेश गायकवाड, जगदीश भगत, राजू साळवे, वशिष्ठ भगत, अतुल अवथरे, प्रियंका जगदीश भगत, राहुल झामरे, प्रणोज बनकर, विजय जिंदे, अरविंद माणिककुळे, महेंद्र जवादे, महानंदा माणिककुळे, स्वप्नील कांबळे, सुबोध सोनवणे, शुभम गोटे, वैभव भगत, संभव इंगोले, सुरज कांबळे, संजय मोडक अँड. रेवती मानवटकर, प्राजक्ता लोखंडे, प्रविण कांबळे, निशिकांत गोटे, भाविक कांबळे,प्रशांत ढोले आदीनी अथक परिश्रम घेतले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या