- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या आरोग्य संस्थांचा सत्कार करुन त्यांना सन्मानित करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अवैद्यकीय पर्यवेक्षक, अवैद्यकीय सहायक तसेच निमवैद्यकीय कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच स्वयंसेवी संस्था, व्यक्ती व समाजसेवक यांनी मागील सहा वर्षापासून राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी व कुष्ठरोग निर्मुलन व जनजागृतीसाठी सहकार्य केले, यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
● हे वाचा – हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप ; अमरावतीच्या युवकाचे संशोधन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी हे अध्यक्ष म्हणून तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदाळे, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. अजय डवले, मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे तसेच कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. अंकुश शिरसाट यावेळी उपस्थित होते.
● हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितीन कदम, तपोवन विदर्भ महारोगी सेवा मंडळ तसेच कोठारा लेप्रसी हॉस्पिटल या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले. यावेळी आरोग्य विभागासह शिक्षण, पोलीस विभाग, नाभीक संघटना, फिटनेस क्लब, चित्रपट निर्माण क्षेत्र, मीडिया, उद्योगक्षेत्र, वृध्दाश्रम, प्रिंटींग प्रेस, उपहारगृह इत्यादी विभागातील मान्यवरांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सांख्यिकी पर्यवेक्षक राजू डांगे तर आभार अवैद्यकीय पर्यवेक्षक गजानन पन्हाळे यांनी मानले.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–