• Tue. Sep 26th, 2023

समाजातील समस्या व उपाय…!

  ‘शिका संघटीत व्हा संघर्ष करा’ डाँ.बाबासाहेब आंबेडकर.. हे वाक्य ऐकून क्रांतिकारी प्रबोधन झाले म्हणून समाज शिकला. फक्त शिकलो आहोत.म्हणून शिकून समस्या संपल्या नाहीत.आपण अल्प काळात शतकानुशतकाची गुलामगिरी तोडून आपण आज राजे झालो श्रीमंत झालो कुणामुळे हे प्रत्येकाच्या मनपटलावर कोरलेले नाव म्हणजे डाँ.बाबासाहेब आंबेडकर होय..जर डाँ.बाबासाहेब नसते तर ही कल्पना सहन होत नाही.. आय ए एस सारखे समाजात आहेत मंत्री आमदार खासदार झालेत हे सगळे डाँ.बाबासाहेब आंबेडकरामुळे..हे सुर्यप्रकाशाइतके खरे असुनही आपण समस्या ग्रस्त का आहोत. कारण आपण संघटीत नाही आपण तुकड्या तुकड्या राहीलो.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  *१)’हि पहिली समस्या आहे’-बौध्द म्हणून घेणारे ही बौध्द नाही. ते आजही मनूची गुलामी करतात.त्यांना नवी क्रांतीमयता मंजूरच नाही ते आपल्याच दुःखासुखात पुर्णपणे गुरफटलेले असतात कारण ते धम्म मापदंड माहीतच नाही.मापदंड म्हणजे काय हे शोधण्याचे काम करत नाही.आपल्या समाजाच्या असणाऱ्या समस्या आणि त्यावरचा उपाय शोधण्याचा हा थोडासा प्रयत्न करत आहे.उपाय या मध्येच सांगितले आहेत.

  ‘शीलाशिवाय आणि जाणीव न ठेवून जर शिकले -सवरलेले लोक निपजू लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा नाश आहे डाँ.बाबासाहेब आंबेडकर’… समस्या म्हणजे काय हे आधी समजून घेऊ यात.समस्या सर्वाच्या समोर उभ्या असलेल्या बंदिस्त मार्ग करणारे जटील प्रश्न !पहिली समस्या आहे समाजातील लोक एकत्र येत नाही,माणसं एक होत नाही संघटीत होत नाहीत,दलित एकामेकांच्या विरोधी भुमीका घेत कितीतरी गट करत आहेत, लाळवण,बावणे,कोचरे,अशा साडेबारा जाती वेगवेगळ्या करून आपण स्वंताःला श्रेष्ठ आणि कनिष्ठ समजू लागलो यातच आपली संपूर्ण हयात जात आहे.

  आज राजकारणात भीतीचे सावट पसरले आहे.लोक धास्तावले आहेत.तरी नेते लोक झोपेत आहेत सामान्य माणूस संविधानाच्या न्यायावर जगत असताना संविधान बदलण्याची भाषा ऐकून लोक या हुकूमशाही मुळे प्रंचड दुःखावले आहे.तरी संविधानाचे अभ्यासक निर्माण होणे आवश्यक .ऐवढे असूनही लोक तटस्थ आहेत.थोडासा विचार करत नाहीत.ते संघटित होत नाही एकदुसर् यांना आवाज देत नाही तुकड्या तुकड्याने राहतात.यामुळे विरोधी पक्ष बरोबर फायदा साधतात .म्हणून दुसर् याला दोष दिल्यापेक्षा आपल्यातील फुटीरवादी लोकांना शोधणे हे म्हहत्वाचे आहे.ते शोधले तरी ते एकत्र येत नाही.

  डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लक्षात घेत नाही.त्यामुळे राजकीय हक्क मिळत नाही सत्तेपासून आपण दुरावतो भरधोस मत मिळत नाही कारण फक्त बौध्दावर आपण सत्तेत येऊ शकत नाही. जरी तेवढी संख्या असली तरी आपलेच लोक फुटीरतावादी आहेत .पैसे साठी ते विचार गाहन ठेवतात ही समस्या आहे..असे आघात सहन करावे लागतात.

  बेरोजगारी वाढत आहे बेकारी पावली पावली आहे यांचे कारण शोधले तर आपणच जबाबदार आहोत पण ही जबाबदारी कोण स्विकारणार..त्यांना वाटते की आम्ही शिकलो,नोकरीवर लागलो ही आमची आम्हीच प्रगती केली आहे आम्ही खुपच हुशार आहोत हे जे विचार आहेत हेच विचार डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तोडण्यासाठी कारण ठरतात.बौध्द लोक असले तरी ते बौध्द होत नाही बौध्दाच्या सर्व सवलती घेतात पण मनातुन बौध्द होत नाही.. संघटित न होण्याची बेजबाबदार वृत्ती वाढत आहे..म्हणून डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे…आपल्या समाजात महार,चांभार,हे जे भेद आहेत ते नष्ट करून सर्व समाज बौध्दधर्माय तयार करणे व इतर समाजातील लोकांना बौध्द करून आपल्यात घेणे असा आपला दुहेरी लढा राहील आणि तो आपल्या ऐक्यशक्तीने यशस्वी होईल. ‘संदर्भ डाँ बाबासाहेब आंबेडकर चरीत्र खंड 12 चांगदेव खैरमोडे पृष्ठ 44/45’

  *२)आपली दुसरी समस्या अशी आहे –बौध्द समाजातले लोक बाबासाहेबांच्या नावाचा गजर करतात ते उत्सव प्रिय लोक झाले आहेत स्वतःपुरत बघण्याची वृत्ती self centred..इतरासंबंधी आपुलकी नसणारी वृत्ती माणसं जोडण्याचा अभाव समाजबांधवासोबत फटकुन वागणारा माणुसघाणा स्वभाव !स्वतःतुन बाहेर पडणारा स्वभाव,असा समाज घडत आहे म्हणून हा समाज फक्त डाँ ,बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावरघेऊन नाचतो पण बाबासाहेबाचे विचार डोक्यात घेत नाही तो धम्म विचार आचरणात आणत नाहीत.डाँ.बाबासाहेब यांच्या नावाचा उदघोष करताना ते पाहत पण नाही कि बाबासाहेबाचे विचार आपण कुठे नेत आहोत.

  बाबासाहेबाच्या नावाचा नुसत गजर करत असताना लोकांना ते सर्वापेक्षाआपण वेगळे कसे आहोत हे दाखवत असतात तुम्ही बुध्दीप्रामाण्यवाद आहात काय ?. बाबासाहेब यांचे तत्त्वज्ञान मांडता येते का?.त्यांची फिलोसाफी तुम्ही स्विकारली काय ? डाँ. बाबासाहेबांचे जागतिक विध्दानाचे तत्त्वज्ञान मान्य आहे का.? बाबासाहेब च तत्त्वज्ञान समाजायला येत नाही कारण ते कठिण आहे .ते कार्य करणे कठीण आहे म्हणून लोकांना नामस्मरणाचा रोग जळलाय. बावीस प्रतिज्ञा ह्या धम्माची ओळख आहे .बावीस प्रतिज्ञा म्हणजे धम्माची ओळख आहे.पण कोण कोण ह्या प्रतिज्ञा पाळतात .डाँबाबासाहेब यांना वाचत नाही त्याच अर्थकारण, राजकारण, धम्मकारण समाज कारण,शिक्षणकारण समजून न घेता त्यांचेच विचार सांगत राहतात पण नवीन विचार त्यांच्या तत्त्वज्ञानातून मांडता येत नाही त्यावर कार्य करता येत नाही.बेकारी का आली हे कारण न वाचता यावर उपाय न शोधता बाबासाहेबाच्या नावाचा गजर फक्त केला जातो.निष्ठाशून्यता सारखे लोक वागतात.

  *3 )तिसरी समस्या आहे- साहित्य विश्वामधे आपण खुप अभ्यास करूनही डाँ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यात बौध्दीक चरीत्राचा अभाव आहे तुम्हाला तुमचा स्वार्थ, अहंकार, तृष्णा, मोह ,उच्चभू असल्यामुळे या समाजाच नुकसान नोकरी वर्गाने केले आहे .कारण आतापर्यंत घरदार साडी माळी गाडी मध्ये राहिल्यामुळे समाजाकडे पार दुर्लक्ष झालं हीच गोष्ट नेमकी साहित्यिक लोकांनी मांडली नाही त्याचा उदघोष केला नाही त्यावर कोणताही प्रबंध लिहला नाही.

  किंवा नोकरदार वर्गाने एक संघटना स्थापन केली नाही आपल्या विसाव्या हिस्साने आपल्या समाजाची कशी प्रगती आपण करू शकतो यावर भाष्य केले नाही. आज तरूण मुले बारावी नंतर शाळाच बंद करतात हे ग्रामीण भागात शिक्षणाविषयी फक्त नोकरीच्याच संदर्भात पाहिले जाते त्यामुळे शिक्षण आपण कशासाठी घेतो यावरचा विश्वास उठलेला आहे. शिक्षण महाग झाले आहे त्यामुळे शिक्षणासंबधी नाराजी दिसत आहे.योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे प्रत्येक घरातील तरुण श्रामणेर झालाच पाहिजे असा नीतीमुल्य नैतिक मार्गदर्शन झाले पाहिजे. आज तरूण पिढी मोबाईल ने गारद झाली आहे. व्यसनाधीन झाली आहे. नितीमुल्याचा अभाव दिसत आहे. तेव्हा शिक्षण किती आवश्यक आहे..हे सांगणे तर आलेच त्या बरोबर रोजगार कसा मिळेल यावर ही लक्ष केंद्रित करावे.

  *४)चवथी समस्या आहे- नोकरवर्ग हा आंबेडकर वाद मानत नाही ,त्याला आंबेडकर वाद महत्त्वाचा वाटत नाही तो आपल्या कमाईचा विसावा हिस्सा देत नाही ,आपण बौध्दीक माणसाची निर्मिती करू शकलो नाही एकदा नोकरी लागली की संपली समस्या .असे त्यांना वाटत ही नोकरी आपल्याच कर्तृत्वाने लागली हा जो खोटा प्रचार होत आहे त्याला कारण आहे समाजच कारण डाँ.बाबासाहेब नसते तर आज आपण कितीही बुध्दीमान असलो असतो तरी आपले हात शेणालाच लागले असते त्यामुळे विसाव्या हिस्साची किमंत आपणास कळते. माणसे बोलतात तशी वागत नाही. बोले तसे चाले त्यांची वंदावी पाऊले म्हणतात ,पण लोक शब्द पोपटपंची करतात.

  *5)पाचवी समस्या आहे-आपल्या समाजात भिक्षू जिथे जातात तिथे दान मागतात धम्म फक्त दानावर आला आहे पैसा मिळविण्यासाठी ते RSsकडे पण जातात आता तर RSsवाल्यांनी नवीन भिक्षु तयार करून लोकांना खोटे नाटे सांगत आहे ! भिक्षु लोकांना मार्गदर्शन न लेण्याच महत्त्व कथन न करता समाजातील .दुःखावरची दवा न होता लोकांची मने न जिंकता ते त्यांच्या सोईने धम्मप्रचार करतात! आपल्या वाणीवर,गुणावर,चरीत्रावर लक्ष न ठेवता एका भिक्षुच्या चुकीमुळे कित्येक भिक्षुवर ही गदा येते.उपासक मोठ्या विवेचनामध्ये असतात कोण चांगले कोण नाही. दिक्षाभुमीवर डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या विरोधात असलेल्या राजकिय नेत्यांना बोलावतात हा कारण पैसा हाच मोठा असतो शेवटी असेच म्हणावे लागेल का ??तृष्णा विनाशलय सांगितला आहे.

  *६वी समस्या आहे- आपली माणस आपसातच भांडणात त्यांना वैचारिक,समाजप्रिय प्रबोधनाचे भांडणे येत नाही .ते एकामेकांचे हेवा दावे .हार तुरे फुले मान सन्मान मी मोठा माझा विचार चांगला त्यांचा नाही .आपल्याला काय करायचे आहे समाजाचे ही वृत्ती एकाएकामेंकाचे पाय होडण्याची स्पर्धा लागलेली असते. मनमोकळे न बोलता खुज्या विचारान राहणार लोक यांचा भरणा समाजात इतका झाला की घराला त्यांच्या समोर कोणी पेटवून दिले तरी ते म्हणतील पाणि टाकण्यासाठी मला नाही बोलावल म्हणून मी कसा काय पाणि टाकू शकतो..एवढी समस्या बेकार झाली आहे समाजात आपल्या, आपल्याच मित्राशी भांडत राहता या मध्ये तुमची मानसिक बौध्दीक शक्ती खर्च होते जे करायला पाहिजे ते करत नाही जे करू नको म्हटले तर अधिक जोर येते ।असे उलट्या विचाराचे लोक झाले आहेत.

  *७वी समस्या आहे- बुध्द तत्त्वज्ञानावर ही प्रश्न निर्माण करतात कारणे शोधतात कि डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जरी बुध्द आणि त्यांचा धम्म लिहला असेल तरी तो कुठे कुठे असा असा आहे. त्यांनी हे कसे लिहले ते कसे लिहले .इतके शहाणे लोक आपल्या समाजामध्ये आहेत त्यामुळे बुध्दाची फिलोसाफी त्यांना मान्य नाही किंवा डाँ.बाबासाहेबाचे तत्त्वज्ञान त्यांना मान्य नाही असे वाटते.आज आपल्या समाजामध्ये शिकलेले मुले असुनही त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळता ते वैफल्यग्रस्त झाले आहेत.

  तरी यावर उपाय म्हणजे अकोला येथील डाँ बाबासाहेब बहुउद्देशिय प्रतिष्ठान यावर उपाय आहे सर्व समस्याचा यावर तिथे उपाय असून u p s c अन mpsc चे बँकिंग चे क्लाँसेच या ठिकाणी सुरू झाले आहेत किमान दोनशे मुलामुलींना या संधीचा फायदा घेता येईल ..तरी समस्या असल्या तरी त्यावर उपाय हा प्रतिष्ठानाने शोधले आहे ..प्रतिष्ठान मध्ये रामजी आंबेडकर बँक आहे ही सर्व बौध्द धम्माच्या लोकांची आहे जो कुणी यांचा शेयर घेणार त्यांना या बँकेचे सदस्य होता येईल .ऐवढेच नाही तर मोठे हाँस्पिटल येथे होणार आहेत तेव्हा डाँक्टर होणारे मुले इथेच घडविले जातील शाळा काँलेज सुरू करून समाजातील मुलांना उच्चशिक्षित देण्यासाठी साह्य करण्यात येईल.

  तसाच विसाव्या हिस्सा नोकरदार वर्गाकडून मिळणारा होता तो मिळत आहे त्यामुळे तसे प्रबोधन होत आहे दानशूर व्यक्तींही समाजासाठी एकजुट करत आहेत तरी समस्या पुर्णपणे संपल्या नाहीत.कारण आजकाल राजकारण आपण पाहत आहोत आपले राजकारण हे पेटते घर झाले आहे .त्या घरामधे काय काय पेटल्या जाईल यांचा काही नेम नाही म्हणून माननीय प्रा.मुकुंद भारसाकळे सरांनी आगीत भस्म होण्यापूर्वीच आपण आपल्या समाजातील लोकांना जागे करून त्यांना संघटीत करण्याचे ठरवले आहे..संघटीत करत आहेत त्यांची टीम आज रोजी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी झटत आहेत.

● हे वाचा – संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ

  सुदैवाने आज भरपूर लोक या जाणिवने धम्मदान करत आहेत..तरी प्रतिष्ठान हे अकोलाकरांनाच लाभदायक नाही तर तमाम महाराष्ट्रा करीता गर्वाची स्वाभिमानी गाथा होय .कि या दानामध्ये फक्त बौध्द उच्चभ्रू उच्चशिक्षित असले तरी सामान्य माणूस.गावखेड्यातील दानदाते आहेत हे या प्रतिष्ठानचे वैशिष्ट्ये आहे..लोकांचा पैसा लोकांच्या साठी वापरता येईल हे एक खास वैशिष्ट्य या प्रतिष्ठानाचे आहे.

  आजच्या समस्या वर प्रतिष्ठानचा उपाय आपणास सांगता येईल म्हणून डाँ.बाबासाहेब यांचे विचार मनोभूमीवर पेरले पाहिजे..नाही तर काय होईल उत्सव प्रियता आंधळी असते.तेव्हा समाज मागे येतो .जोपर्यंत समाजाला वाटते मीच पुढे गेलो .मला मिळालेल यश हे फक्त माझेच हे विचार आले की त्या व्यक्तीचे अधंपतन कोणीही थांबंवू शकत नाही कारण या देशात पशुंना देखील काही सवलती होत्या त्यांनाही जगता येत होत कुत्र्यामाजरांना जेवढ्या सवलती मिळतात तेवढ्याच सवलती गुण्यागोविंदाने आम्हाला या देशात मिळत नाही त्या भूमीला मी माझी भूमी कशी म्हणू ..आणि त्या भूमीतील धर्माला माझा धर्म म्हणण्यास मीच काय पण ज्याला माणुसकीची जाण आहे नि ज्याला स्वाभिमानाची चाड आहे असा कोणताही अस्पृश्य तयार होणार नाही.

  डाँ बाबासाहेब आंबेडकर …हा जथा ईतवर आणला आहे आपल्या समस्याची लिस्ट कमी होत नाही आज समाज तत्त्वज्ञानशून्येच्या संकटात सापडलेला आहे काही लाँजिकल .काही विवेकी आणि काही सुसंगत बोलण्याला अर्थ उरला नाही की काय ?असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झालेली आहे त्याच बरोबर भारतीय लोकांना संविधानातील विज्ञाननिष्ठा ,बुध्दीवाद ,सेक्युलरिझम ,मानवतावाद,आणि पुनर्रचना या गोष्टी धर्मांधांना समजावूनच घ्यायच्या नाहीत असे वाटते.

  डाँ बाबासाहेब आंबेडकर हे असे महान क्रांतिनायक आहेत की ज्यांच्या प्रज्ञानाला सिमा नाहीत त्यांच्या माणुसकीला कोणतेही किनारे नाहीत आणि त्यांच्या मानवी सौहार्दाच्या अंतराळाला कोणतेही मर्यादा मान्य नाही याचा अर्थ असा आहे की डाँ.बाबासाहेब आंबेडकर हे विराट विश्वप्रज्ञेचंच अजोड प्रारूप आहे क्षितीजांचे नकार निकामी करून उगवलेला हा तत्त्वज्ञानसुर्य जगाच्या विचारक्रेंद्रात नवनव्यांन आता पिसारू लागला आहे. असा महामेरू कायदा पंडीत जागतिक विध्दान आपल्याला लाभले हे माणूसपणाची अत्तपौणिमा आहे मनामनात उगवलेल तारागंण आहे.या तारागंण बुध्दमय झालेल आहे तरी आपण या तारागंणाचे मुल्यमापन अंधारात करतो आणि अहंकाराचा रोग स्वताःहुन ओढवून घेतो तेव्हा हे ज्ञान विज्ञान प्रज्ञान दुषित होते.. हा दुषित पणा टाळायचा असल्यास आपल्याला आपला शोध घ्यायला हवा .या शोधातून आपले मन काय सांगते ते ऐकायचे असते जी व्यक्ती आपल्या सोबत इतरांच्या जीवनाचा विचार करते.तीच व्यक्ती सर्व श्रेष्ठ होय..

  उठा जागे व्हा समाजाला दिशा द्या
  माणसा माणसाचे विचार अन प्रेम घ्या
  प्रगतीच्या वाटा बघत आहात तुमच्या
  एकदुसर् यांना सन्मानपूर्वक ज्ञान हात घ्या
  -सुनीता इंगळे
  मुर्तिजापूर
  72 18 69 43 05
  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,