संविधान पर्वावर भगवान बद्ध व त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित भव्य स्पर्धा परीक्षेचा बक्षिस वितरण व सन्मान सोहळा

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : बौद्ध उपासक संघ भिमटेकडी परिसर अमरावती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, उत्तम नगर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, उत्तम नगर अमरावती येथे नुकतीच घेण्यात आली होती.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    सदर परीक्षेकरिता एकूण 344 विद्यार्थ्यांनी नामाकंन केले आणि परीक्षेला 280 विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग नोंदविला. त्यामध्ये गुणानुक्रमे आलेल्या विद्यार्थ्यांना रोख राशी, सन्मानपत्र वितरण सोहळा रविवार दिनांक 27/11/2022 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, संबोधी भिमटेकडी, अमरावती येथे दुपारी 2.00 वाजता आयोजित केलेला आहे. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण होईल.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत व बौद्ध उपासक संघाचे अध्यक्ष मा. शिवा प्रधान हे भूषवतील, तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रा. मुकुंद भारसाकळे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहूउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान, अकोला, विशेष अतिथी मा. डॉ. पडवाल मल्लू प्राचार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती, माजी प्राचार्य डॉ.गोपिचंद मेश्राम, भारतीय महाविद्यालय, मोर्शी, मा. समाधान कांबळे, संस्थापक सचिव त्रिरत्न बौद्ध विहार, वाशिम, मा. मंगेश बबनराव डांगे, उपपोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, बाभूळगांव जि. यवतमाळ, प्रा. रजनी गेडाम, पाली विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती, हे राहणार आहेत.

    बुद्ध आणि त्यांचा धम्म ही स्पर्धा परीक्षा दिलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात येईल. संविधान पर्वावर होत असलेल्या या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधान पर्व 2022 हे यशस्वी करावे असे आवाहन करणार्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पडवाल मल्लू व बौद्ध उपासक संघाचे आयु. उमेश शहारे सचिव, आयु. गंगाधरराव इगळे कोषाध्यक्ष, आयु. भाऊराव डहाट उपाध्यक्ष, सहसचिव आयु. नामदेवराव वाघमारे, आयु. ज्योती बोरकर महिला उपाध्यक्षा, आयु. आनंद इंगळे संघटक, आयु. नलिनी नागदिवे संघटिका, कार्यकारी सदस्य,आयु. चरणदास काळे, व्यंकटराव खोब्रागडे,आयु. नंदिनी वरघट, आयु. राहूल हिरकने, आयु. पुष्पाताई दंदे, आयु. अवधूत गजभिये, आयु. अतिनाताई रोडगे, बुद्ध आणि त्यांचा धम्म ही स्पर्धा परीक्षा दिलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देवून त्यांचा गौरव समारंभात केल्यात जाईल तरी या संविधान पर्वावर होत असलेल्या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधान पर्व 2022 यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

——