- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : करजगाव ता. दारव्हा जि यवतमाळ येथील प्रतिष्ठित नागरिक संतोष रामरावजी चौधरी यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई रामरावजी चौधरी यांचे अल्पशा आजाराने दि.३१/१०/२०२२ रोजी दु:खद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय ७६ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती रामरावजी उकंडराव चौधरी, मुले राजेश, अविनाश, संतोष, स्नुषा लताताई, प्रियाताई, रेखाताई, मुलगी सौ. छायाताई उत्तमराव कापसे, जावाई उत्तमराव कापसे, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
मातोश्री लक्ष्मीबाई रामरावजी चौधरी या अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने ते सर्वत्र परिचित होत्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर स्थानिक हिंदू स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.