अमरावती (प्रतिनिधी): करजगाव ता. दारव्हा जि यवतमाळ येथील प्रतिष्ठित नागरिक शेषराव रामलाल राठोड यांचे अल्पशा आजाराने आज दि.०४/११/२०२२ रोजी दु:खद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय ६५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात मुलगा प्रवीण, स्नुषा मुलगी सौ. कल्पना जाधव, जावाई मधुकर जाधव, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
Contents hide
अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आला.याप्रसंगी आठवणीतील करजगाव समूहाचे वतीने सर्व सदस्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.