• Sun. May 28th, 2023

मोर्शी वरुड तालुक्यातील प्रलंबित विषय तात्काळ सोडवा – आमदार देवेंद्र भुयार

    * आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक !
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    मोर्शी तालुका प्रतिनिधी : मोर्शी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विषयांसंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक झाली. जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी या सर्व विषयांची तत्काळ दखल घेऊन त्या त्या विषयाशी संबंधित विभागाला ते सोडवण्याबाबत आदेश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पवणीत कौर यांच्यासमवेत संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत आमदार देवेंद्र भुयार यांनी विविध समस्या तसेच प्रलंबित असलेली कामे मांडली.

    वरुड न.प. हद्दीतील शिवाजी महाराज पुतळ्याचे परवानगी बाबत, उखेड तरोडा पांधन रस्त्यावर रेल्वे फाटक किंवा रेल्वे पुलाचे बांधकामाबाबत, जिल्हा नियोजन समीती मधुन राजुरा बाजार प्रवासी निवा-याचे बांधकामाचा निधी उपलब्ध करुन देणे, अल्पसंख्याक बहूल ग्रामीण क्षेत्रात मुलभुत, पायाभुत सुविधा उपलब्ध करण्याचे प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी प्रदान करणेबाबत, वरुड नगर परिषदेसाठी मंजुर करण्यात आलेली फायर ब्रिगेड गाडी उपलब्ध करुन देणेबाबत कार्यवाही करणे, पार्डी ता.मोर्शी येथे विपश्यना केंद्रासाठी शासकीय जमीन उपलब्ध करुन देणेचा प्रस्ताव तात्काळ मार्गी लावणे, अतिवृष्टीमध्ये खचलेल्या विहीरींचे पंचनामे करण्याबाबतची कार्यवाही करणे, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतींचे नुकसानीचे अनुदानामधुन बँकेत शेतक-यांकडून करण्यात येत असलेली कर्ज वसुली थांबवीने तसेच शेतक-यांचे खात्यवर लावलेले निर्बंध तात्काळ उठविण्याबाबत बँकेला निर्देश देणे, बेल सावंगी जि.प.लघु सिंचन प्रकल्पातील नाल्याचे पाण्यामुळे सतत शेतक-यांचे पिकाची होत असलेले नुकसान कायमस्वरुपी थांबविण्यासाठी सदर जमीनीचे संपादित करणे तसेच सन २०१२ पासुन २०२२ पर्यंत पिकाचे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतक-यांना तात्काळ अदा करणे, वरुड तालुक्यातील १९९१ च्या पुरामुळे बाधित झालेल्या २८ गावांचे अंशतः पुनर्वसन प्रस्ताव शासनाकडे सादर करणे, वरुड तालुक्यातील १९९१ च्या पुरामुळे बाधित झालेल्या ३ गावांवे पुर्णतः पुनर्वसन प्रस्ताव शासनाकडे सादर करणे, गव्हाणकुंड स्मशानभूमि करीता (दलीत बांधवारीता) जागा उपलब्ध करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून मोर्शी वरुड तालुक्यातील विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावून अतिवृष्टी पुरामधील पुनर्वसनाचे विषय आमदार देवेंद्र भुयार यांनी मांडले.

    या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून ते तातडीने कसे सोडवता येतील याबाबत निर्णय घेण्यात आले. असून मोर्शी वरुड तालुक्यातील समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी आमदार देवेंद्र भुयार यांना दिले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *