• Mon. Jun 5th, 2023

महाराष्ट्राचे सुपूत्र न्या.डॉ.डी.वाय.चंद्रचूड यांनी 50 वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ

    नवी दिल्ली, 09 : महाराष्ट्राचे सुपूत्र न्यायमूर्ती डॉ. धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी आज भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

    राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉल मध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या.चंद्रचूड यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, विधी व न्याय मंत्री किरेण रिजिजू यांच्यासह माजी सरन्यायाधीश उदय लळीत, सर्वोच्च न्यायालयाचे तसेच उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

    सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कार्यकाळ 8 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्ण झाला. न्या. डॉ.डी.वाय. चंद्रचूड आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळतील. सरन्यायाधीश श्री. चंद्रचूड यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असून ते नोव्हेंबर 2024 पर्यंत या पदावर असणार आहे. धनंजय चंद्रचूड हे दिवंगत माजी सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड यांचे सुपूत्र आहेत.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *