• Sun. May 28th, 2023

बुटी प्लॉट स्थित गुरुद्वारा येथे आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी टेकला माथा

    * श्री गुरुनानक देवजी यांच्या ५५३ व्या प्रकाश पुरब ची दिली लख-लख बढाई
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : शीख पंथांचे प्रेरणादायक महान व प्रथम गुरू श्री गुरुनानक देवजी यांची ५५३ व्या प्रकाश पूरब निमित्य आ. सौ .सुलभाताई खोडके यांनी सर्व शीख बांधव, तमाम अनुयायी व शहरवासीयांना गुरुनानक जयंतीची लख-लख बढाई दिली. मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा गुरुनानक जयंती च्या दिनी गुरुद्वारा श्री गुरु सिंघ सभा बुटी प्लॉट अमरावती येथे जाऊन गुरु दरबारात माथा टेकला.

    यावेळी आमदार महोदयांनी गुरुवाणी कीर्तन मध्ये अनुयायांसह सम्मिलीत होऊन विविध कार्यक्रमात सुद्धा उपस्थिती दर्शविली. श्री. गुरुनानक देवजी यांनी मानवतेची, सर्व धर्म समभावाची शिकवण दिली. ते सत्य वचन, अहिंसा व सदाचाराचे पुरस्कर्ते होते. गुरुवाणीतून त्यांच्या पवित्र संदेशाचे वर्णन होते , आजच्या काळात सुद्धा त्यांचे वचन व संदेश हे मानवी कल्याणासाठी प्रेरक असल्याचे मनोगत आमदार महोदयांनी व्यक्त केले. तसेच गुरुद्वारा सभा च्या वतीने १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर पर्यंत च्या प्रकाश पुरब दरम्यान आयोजित विविध कार्यक्रम व उपक्रमाची प्रशंसा केली.

    यावेळी गुरुद्वारा श्री गुरु सिंघ सभा बुटी प्लॉट अमरावतीच्या वतीने आ. सौ. सुलभाताई खोडके व यश खोडके यांचा सत्कार करण्यात आला . या प्रसंगी सुखमणी साहेबजी , भाई भूपिंदर सिंग जी यांची यांनी पाठ व कीर्तन सादर करून धन धन श्री गुरुनानक देवजी यांच्या प्रकाश पूरबचे महत्व विशद केले. यावेळी माजी महापौर सौ. रीना ताई नंदा, यश खोडके, गुरुद्वारा श्री गुरु सिंघ सभा बुटी प्लॉट अमरावती चे अध्यक्ष गुरबिंदर सिंघ बेदी, कार्याध्यक्ष राजेंद्र सिंघ सलुजा, सचिव डॉ. निक्कू खालसा, तसेच कोषाध्यक्ष अमरज्योत सिंघ जग्गी, संरक्षक बिट्टू सिंघ सलुजा, दिलीप सिंघ बग्गा, विक्की पोपली , सोनू बग्गा , राजेंद्र सिंघ छाबडा, हरविंदर सिंघ राजपूत, अमरजित सिंघ जुनेजा, अजिंदर सिंघ मोंगा, तजींदर उबोवेजा आदींसह समाज बांधव, अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *