• Mon. Jun 5th, 2023

जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींचे मतदान आदर्श आचारसंहिता लागू

  ● ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2022
  ● 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबरला मतमोजणी
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून त्याअनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे –

  शुक्रवार, दि. 18 नोव्हेंबरला तहसीलदार यांच्याव्दारे निवडणुकीची नोटीस प्रसिध्द केल्या जाईल. दि. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविणे व सादर करण्याचा कालावधी राहणार असून त्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ राहील. दि. 5 डिसेंबरला सकाळी 11 वाजेपासून छाननी संपेपर्यंत नामनिर्देशनपत्र छाननी केल्या जाईल.

  दि. 7 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येईल. तसेच दि. 7 डिसेंबरलाच दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ राहील.

  दि. 18 डिसेंबरला सकाळी 7.30 वाजतापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची तारीख राहील. दि. 20 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक राहील.

  दि. 23 डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक राहील.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *