- “अरे गन्शा बरं झालं तु भेटला बावा,दे बरं उलीसा तमाखु.”
- “सायकल उभी करुन सुतन्याच्या खिशात झामलुन रायलां व्होता तव्हाच मी समजलो……घे…” गन्शानं बांडीसच्या खिशातून घन्शामले डब्बी काळून देल्ली.
- “तमाखुची डब्बी घरीच भुललो राज्या!तुले तं माईतच हाये तल्लफ आली कां मले काईच सुचत नाई मनुन.चित देवयात न मन खेटरात रायते मावलं.”
- “काई ईशय नाई ना बे,घे जेवळा लागंन तेवळा घे.” जसं काई तमाखुनं झोराच भरला हाये अशा थाटात गन्शा बोल्ला.
- तमाखु व्हटात दाबुन झाल्यावर घन्शाम नॉर्मल झाला.
- “कुठं चाल्ला व्होता येवळ्या घाईत.” गन्शानं अंदाज घेतला.
- “सुंदरलाल मारवाळ्याले कापूस ईकला काल,पैसै आनाले चाल्लो.”
- “कावुन!मार्केटात कावुन नाई नेला,चांगला भाव भेटला असता.”
- “दोन किंटल त झाला बे,त्याच्यासाठी बंडी भरनं पुरते काय?तेवळ्याले तेवळंच पडते.पैसे भेटले कां तुया वैनीले न्याले जातो श्यापुरले.भाऊबीजीले गेली तं थे तिकळेच हाये.साया लय मागं लागला मावला,याच मने बाप्पू औंदा,मस्त पावनचार करतो.”
- “मलेई वरुडात जाआचं हाये,मी यिवू काय तावल्या सायकलवर मांगं डबलशीट.”
- “येनं बावा,काई ईशय हाये काय तुयासाठी.”
- दोघंई चार वाजता वरुडात आले,गन्श्यानं भुक लागल्याचा बायना करुन घन्शामले हाटेलात नेलं.
- घन्शामले हाटेलात जानं आवळे नाई, ‘हाटेलात खानं मनजे मसनात जानं’ असं त्याले वाटे.पन सकायच्या तमाखुले जागून त्यानं मनावर गोटा बांधला.
- हाटेल मालकानं गन्शाले मुकऱ्या-मुकऱ्या हासुन स्यालुट मारला,दोन -तीन वेटरनंई वाकुन रामराम केला.
- गन्शाचा असा थाट पाहून घन्शामनं मनातल्या मनात पाचंई बोटं तोंडात घातले.
- हाटेलात दारु गिरुची सबंन सोय होती.गनशानं इंग्रजी दारुची पावटी बलावली.पयली झाली,दुसरी घेतली,तिसरीई दाबून टुन्न झाला गळी,कसातरी जेवला.अन हाटेलचं बील द्याले खिशात हात घातला तं खिसा ढनढन!(थो पयलेच ढनढन होता,गन्शा नाटक करन्यात माहीर होताच.)
- मंग थो बह्याळल्या नजरीनं टुकमुक घन्शामकळं पाह्ये.
- घन्शाम जे समजाचं थे समजला,त्यानं गपचुप अकराशे रुपये काळून हाटेलचं बील चुकतं केलं.हाटेलमालक घन्शामकळं पाहून कुचिनावानी हासला.
- हाटेलातून बाहीर नाई पडत तं सुंदरलाल मारवाळी हाटेलाच्या बाहीर उभा दिसला,गन्शाची अन त्याची नजरानजर झाली.गन्शा रोज असे बकरे पायते हे त्याले माईत व्होतं.”काय गन्शा,आज कोनाले देल्ला दांडू?”
- बाजूनच उभ्या असलेल्या घन्शामनं मारवाळ्याचं असं वाक्य आईकल्याबराबर त्याले आपल्या डोक्शावर कोनाचे तरी पाच-पन्नास दांडू पडल्यासारखे वाटले.
- घन्शामले सकायचा तमाखु लय म्हागात पडला.
- (टीप:-हे गोठ घन्शामच्या बोयकोले कोनी स़ांगू नोका रे बॉ.)
- -आबासाहेब कडू
- ९५११८४५८३७
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
Contents hide
- – बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–