• Fri. Jun 9th, 2023

‘कुरंगू पेडल’ एका पिढीचा सायकलशी असलेला भावनिक संबंध टिपतो

    * ‘कुरंगू पेडल’ बालपणीचा निरागसपणा आणि बाप-मुलामधील भावबंध साकारतो: कमलाकन्नन, दिग्दर्शक

    गोवा/मुंबई, : कुरंगू पेडल चित्रपटात एका मुलाला सायकल चालवायला शिकायची आहे, तर त्याच्या वडलांना सायकल चालवता येत नाही, या कथानकावर आधारित चित्रण केलं आहे. “ही कथा माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहिली कारण सायकल ही माझ्या बालपणातली सर्वात आकर्षणाच्या गोष्टींपैकी एक होती. सायकल चालवायला शिकल्याने आत्मविश्वास मिळतो, याच गोष्टीने मला चित्रपट बनवायची प्रेरणा दिली”, चित्रपटाचे दिग्दर्शक कमलाकन्नन म्हणाले.

    गोव्यामध्ये 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पीआयबी द्वारे आयोजित ‘टेबल टॉक्स’ सत्रांपैकी एका सत्रात माध्यमांशी आणि महोत्सवाच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना, कमलाकन्नन म्हणाले की कुरंगू पेडल एका पिढीचा सायकलशी असलेला भावनिक संबंध टिपतो.

    सायकलवर चित्रपट बनवण्यात रस का वाटला, यावर उत्तर देताना कमलकन्नन म्हणाले की “सायकल आपल्याला बालपणाची आठवण करून देते आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना त्यांच्या बालपणीची आठवण करून दिली आहे.” ते पुढे म्हणाले की, बालकलाकारांचा निरागसपणा त्यांचा खेळकरपणा, त्यांच्यामधील मैत्रीचे बंध आणि भावना प्रेक्षकांना भूतकाळात घेऊन जातात. उच्च बजेटच्या चित्रपटांपासून असलेल्या स्पर्धेबद्दल विचारल्यावर दिग्दर्शक म्हणाले की, चित्रपटाचे कथानक, गोळीबंद पटकथा आणि कलाकारांची कामगिरी मोठ्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी महत्वाची असते.

    या चित्रपटातील आपल्या अनुभवाविषयी बोलताना अभिनेता काली वेंकट यांनी मान्य केले की, तमिळमध्ये 90 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असूनही या चित्रपटातून पदार्पण केलेल्या बालकलाकारांकडून त्यांना खूप काही शिकायला मिळाले. त्यात भर घालत, कथा-लेखक रसी अलगप्पन यांनी आनंद व्यक्त केला की, दिग्दर्शकाने कथेतील भावना निष्ठेने टिपत सुंदरपणे पडद्यावर साकारल्या आहेत.

    रासी अलगप्पनच्या ‘सायकल’ या लघुकथेवर आधारित हा चित्रपट 53 व्या इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा श्रेणीतील सुवर्ण मयूर पुरस्कार आणि युनिसेफ – आयसीएफटी गांधी पदकाचा दावेदार आहे. या दृश्यात्मक आनंद देणाऱ्या आणि नॉस्टॅल्जिक चित्रपटाचे संगीत घिब्रान यांनी दिले आहे, ज्यामध्ये “मारी” ही प्रमुख भूमिका बालकलाकार संतोष याने, तर त्याच्या वडलांची, ‘कंदासामी’ची भूमिका अभिनेता काली व्यंकट यांनी साकारली आहे.

    सारांश:

    1980 च्या कालखंडावर बेतलेला हा चित्रपट बालनायक मारियप्पन (मारी) आणि सायकल चालवायला शिकण्याच्या त्याच्या शोधाबद्दल आहे. गावामध्ये भाड्याच्या सायकलचे पहिलेच दुकान उघडते. भाड्याने सायकल घेण्यासाठी पैसे नाकारल्यामुळे, मारीला त्याच्या लाड करणाऱ्या आईकडून सायकलिंग शिकण्यासाठी सायकल भाड्याने घ्यायला गुपचूप पैसे मिळतात आणि त्यानंतर मनोरंजक घटना आणि अनोळखी पात्रांची धावपळ याचा घटनाक्रम चित्रपटात दिसतो.

    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

0 thoughts on “‘कुरंगू पेडल’ एका पिढीचा सायकलशी असलेला भावनिक संबंध टिपतो”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *