• Sun. Jun 4th, 2023

Rashtrasant Tukdoji : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान केव्हा ?

    तिवसा (डॉ.नरेश शं.इंगळे)

    गावापासून ते देशापर्यंत देशापासून अखिल विश्वाला मानवतेचा विचार देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जोर धरत आहे. महाराजांनी रचलेल्या साहित्यातून आजही समाज प्रबोधन अविरत समाज जागृतीचे काम सुरू अशा राष्ट्रयोद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न सन्मान द्यावा अशी मागणी गुरूदेव भक्त अनेक वर्षापासून करीत आहेत. या मागणीकरिता गुरूदेव सेवा मंडळासोबत इतरही सामाजिक संघटना प्रश्न करीत आहेत. यासंबंधात राज्य सरकारचा केंद्र सरकार कडे पाठपुरावा तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सन २००६ ,व २००८ मध्ये केंद्र सरकार कडे भारतरत्न सन्मान ठरावाचां पाठपुरावा केला होता,परंतु अद्याप केंद्र सरकार जवळ तो प्रस्ताव धूळ खात आहे,या अतिशय महत्त्वपूर्ण भारतरत्न प्रस्तावावर काहीच चर्चा झाली नाही. त्यामुळे समस्त गुरुदेव सेवकामध्ये तीव्र अस्वस्थता पसरलेली आहे. तेव्हा आता ही चळवळ होत आहे.

    अनेक गावांतून निवेदने, ग्रामसभेचे ठराव पंतप्रधान भारत सरकार नवी दिल्ली यांना जात आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विश्वव्यापी कार्य लक्षात घेता तात्काळ भारत सरकारने त्यांना भारतरत्न सन्मान बहाल करून जनतेची ही मागणी पूर्ण करावी. तुकडोजी महाराज यांचे प्रचंड सामाजिक व राष्ट्रीय कार्य देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, त्यांचे साहित्य आदी लक्षात घेता त्यांना मरणोत्तर भारतरत्न त्वरित बहाल करावा, अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. यापुढे या मागणीवर लोकशाही पद्धतीने व्यापक आंदोलन उभे होण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. त्यासाठी गावोगावी सभेचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामपातळीवरून भजन आंदोलन करून निवेदने पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर तालुका व जिल्ह्याच्या स्तरावर भजन आंदोलन करून निवेदने सादर करण्यात आलेले आहे .
    आज लाखो लोक महाराजांच्या विचार आणि साहित्याचा प्रचार करण्यासोबतच आचरणसुध्दा करून जीवनाचे सार्थक करताना दिसतात. महाराजांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून एक आदर्श समाज निर्माण नक्कीच करता येईल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान देण्यात यावा, यासाठी लाखो गुरुदेवभक्त अनेक वर्षांपासून मागणी करीत आहे.

● हे वाचा – संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ

    केंद्रसरकारला बराचसा पाठपुरावा सुरूच आहे; परंतु अजूनही काही विचार केला जात नसल्याने गुरुदेवभक्तांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.त्यामध्ये या विचाराने प्रेरीत होऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंचाचे युवकांनी शासनाला एक लाख पत्र पाठवून ही मागणी या पूर्वीच केली आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या समस्त गुरुदेव प्रेमीच्या भावनेचा आदर करून त्वरित केंद्र सरकारने मानवतेचे महान पुजारी, राष्ट्रयोद्धा, समाज सुधारक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान देऊन सन्मानित करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली.

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    – बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *