Header Ads Widget

जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त 4 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील विविध ठिकाणी मानसिक विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयामध्ये मानसिक आरोग्य सप्ताहाचे उद्घाटन व जनजागृती कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, प्रमुख मार्गदर्शक मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने होते. प्रमोद निरवणे व डॉ. अमोल गुल्हाने यांनी उपस्थित रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांना मानसिक आजार, त्याची लक्षणे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच रुग्णांचे नातेवाईकांच्या प्रश्नांचे निराकरण केले.

    परिचारिका श्रीमती पेंदाम, सुनील कळतकर, सायली डंभे, भावना पुरोहित, श्रध्दा हरकंचे, नदीम पठाण, शुभम झळके यांनी कार्यक्रमासाठी सहाय्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रमोद भक्ते यांनी मानले. रूग्ण व रूग्णांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या