Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

कशी पेटवू रे वात ?

  डूबलं रे पिक सारं
  गेली पाण्यात कमाई
  सांग सांग रे सायबा
  कशी करु मी दिवाई !!
  झाली वरचढ आज
  फुशी फटाक्याची वात
  गड्या मातीमोल झाली
  माह्या पणतीची वात !!
  तेलं बेइमान झालं
  कापसाच्या त्या वातीले
  कसं वांझपण आलं
  खापराच्या पणतीले !!
  कसा लाऊ दिवा देवा
  घरी दारी मी देव्हारी
  असे लक्ष्मीचा निवास
  निच बेइमाना घरी !!
  दीप आरास पेटली
  भ्रष्ट दुराच्याऱ्या घरी
  कसा अंधारात झोपे
  बळीराजा कष्टकरी !!
  गोड दिवाई लागेना
  पेटली रे महागाई
  स्वरक्ताचेच व्यापारी
  आज झालेत कसाई !!
  कसा लावू तेलदिवा
  तेल चटणीवर न्हाई
  दिवे लावाया पाण्याचे
  येतील काय बाबा साई ?
  -वासुदेव महादेवराव खोपडे
  सहा.पोलीस उपनिरिक्षक (सेनि)
  अकोला (9923488556)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code