Header Ads Widget

मनपा कर्मचारी दिलीप गाढवे यांचा सेवानिवृत्‍ती निमित्‍य भावपुर्ण सत्‍कार

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या प्रकाश विभागातील कर्मचारी दिलीप गाढवे यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विभागाच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. कार्यकारी अभियंता-१ रवींद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. रत्नदीप वानखडे यांनी दिलीप गाढवे यांच्या सेवा काळातील त्यांच्या सकारात्मक योगदानावर प्रकाश टाकला.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश तीरथकर, दामोदर मुधोळकर, धीरज पार्शिवकर, रोशनी पाटील आदींनी परिश्रम घेतले. यावेळी शरद तिनखेडे, कमलाकर जोशी, अब्दुल अकिल, वैभव काळे, शुभम जावरे, अभय जवंजाळ, अर्शद जावेद, दिलीप नांदुरकर, संदीप चौधरी,मुहम्मद जुबेर,नीरज दासवत, पंकज वाघ,उमेश पोफळे, नंदन लोयबरे, रवींद्र गणवीर,शुभम राऊतकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या